Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5857

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १०,४९८ वर, दिवसभरात ५८३ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांनी आज दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवीन ५८३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातीळ कोरोना बाधितांची संख्या १०,४९८ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज एकूण १८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात राज्यात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ९ हजार ९१५ होती. त्यामध्ये आता ५८३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या १० हजारांच्याही पुढे गेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या संख्या १५१ वर पोहोचली आहे. तर हिंगोली जिल्ह्यात करोनाचे आणखी चार रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या २१ वरपोहोचली आहे. धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आज २५ नव्या रुग्णांची भर पडली आहे.वाढत असले तरी दुपटीनं वाढण्याचा वेग ७ दिवसांवरून १० दिवसांवर गेला आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे.

कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय ताजी आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील ट्विटर लिकांवर क्लिक करा

 

मुंबई महानगर पालिका -७०६१
ठाणे – ४८
ठाणे मनपा – ४१२
नवी मुंबई मनपा – १७४
कल्याण डोंबिवली मनपा – १६३
उल्हासनगर मनपा – ३
भिवंडी मनपा – १७
मीरा भाईंदर – १२६
पालघर – ४१
वसई -विरार – १२८
रायगड – २४
पनवेल मनपा – ४७
ठाणे मंडळ एकूण – ८२४४

नाशिक – ६
नाशिक मनपा – २०
मालेगाव मनपा – १७१
अहमदनगर – २६
अहमदनगर मनपा – १६
धुळे – ८
धुळे मनपा – १७
जळगाव – ३०
जळगाव मनपा – १०
नंदुरबार – ११
नाशिक मंडळ एकूण – ३१५

पुणे – ६३
पुणे मनपा – १११३
पिंपरी चिंचवड मनपा – ७२
सोलापूर – ७
सोलापूर मनपा – ९२
सातारा – ३२
पुणे मंडळ एकूण – १३७९

कोल्हापूर – ९
कोल्हापूर मनपा- ५
सांगली – २८
सांगली मिरज कुपवाड मनपा – १
सिंधुदुर्ग – २
रत्नागिरी – ८
कोल्हापूर मंडळ एकूण – ५३

औरंगाबाद – २
औरंगाबाद मनपा – १२९
जालना – २
हिंगोली – १५
परभणी – ०
परभणी मनपा – २
औरंगाबाद मंडळ एकूण – १५०

लातूर – १२
लातूर मनपा – ०
उस्मानाबाद – ३
बीड – १
नांदेड – ०
नांदेड मनपा – ३
लातूर मंडळ एकूण – १९

अकोला – १२
अकोला मनपा – २७
अमरावती – २
अमरावती मनपा – २६
यवतमाळ – ७९
बुलडाणा – २१
वाशीम – २
अकोला मंडळ एकूण – १६९

नागपूर – ६
नागपूर मनपा – १३३
वर्धा – ०
भंडारा – १
गोंदिया – १
चंद्रपूर – ०
चंद्रपूर मनपा – २
गडचिरोली – ०
नागपूर मंडळ एकूण – १४३

इतर राज्ये – २६
महाराष्ट्र एकूण – १०४९८

राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी केली निवडणुकीची मागणी

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे समजत आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि जमेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल रोजी संपला आहे. या रिक्त जागा भरण्याकरता एप्रिल महिन्यातच निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व निवडणूक पुढे ढकलल्या. आता राज्य सरकारकडून ही निवडणुक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणुक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आल्याचे समजत आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणत्यातरी एका सभागृहावर निवडून येणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ठाकरे यांच्या आमदारकीसाठी प्रयत्न केले जात आहेत. “केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घेता येऊ शकतात”, असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गरजू पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ‘रिलीफ पुणे’ वेबसाईट ठरतेय वरदान

पुणे प्रतिनिधी | सतीश उगले

पुणे पिंपरी-चिंचवड भागामध्ये लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरूण इंजिनियर आणि डाॅक्टरांनी एकत्र येऊन गरजू, प्रत्यक्ष मदतकार्य करणारे आणि देणगीदार यांच्यासाठी reliefpune.in नावाची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर विभागवार प्रत्यक्ष मदतकार्य करणारे, देणगीदार आणि गरजू यांची माहिती आणि संपर्क क्रमांक मिळवणे या वेबसाईटच्या माध्यमातून शक्य होईल.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात २४ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू अाहे. कोरोना हाॅटस्पाॅट भागामधील लाॅकडाऊन वाढण्याची देखील शक्यता आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारांनी लाॅकडाऊनचा अवलंब केला असला तरी, याची दुसरी दुर्दैवी बाजू ही आहे की, परप्रांतीय बिगारी कामगार, बेघर, अडकलेले स्थलांतरित मजूर, कचरावेचक, एकाकी वयोवृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथीय, स्पर्धा परिक्षक इत्यादी लोकांचे रोजचे जगणे कठीण होऊन बसले आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, लोक व गट त्या लोकांपर्यंत मदतकार्य पोचवत आहेत.

पण गरजूंना मदत कुठे मिळते आहे? मदत करणाऱ्यांना गरजू नेमके कोणत्या भागात आहेत? तर देणगीदारांना देणगी कुठे द्यायची? इत्यादी प्रश्न लोकांना पडता. म्हणून अशा सर्वांना एका पातळीवर आणण्यासाठी, काही समविचारी डाॅक्टर आणि इंजिनियर यांनी मिळून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. [पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मदतकार्य वेगाने होण्यासाठी काॅमन वेबसाईट – (https://reliefpune.in/)]

ही वेबसाईट कुठल्याही सामाजिक संस्थेने बनवलेली नाही. वेबसाईट बनवणारा गट स्वतःकडे कुठलीही देणगी स्वीकारत नाही. मदतकार्यासाठी काम करणारा आणि गरजू यांना जोडण्याचे काम ही वेबसाईट करते.

या वेबसाईटची वैशिष्ट्ये

१. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या भागातील 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक.

२. किराणा, जेवण, आसरा, साबण-सॅनिटायझर, पीपीई, घरपोच सेवा, वाहनसेवा, आरोग्यसेवा, हेल्पलाईन इ. विविध मदतकार्यांचा समावेश.

३. रोजंदारीवरचे कामगार, स्थलांतरित, बेघर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कचरावेचक, तृतीयपंथी, सेक्सवर्कर्स यांच्यासाठीच्या मदत कार्याचा समावेश.

४. शहरातील भाग, मदतीचे स्वरूप, मदत दिलेला समुदाय यानुसार मदतकार्य शोधण्याची सोय.

५. देणगी(वस्तू, धान्य, पैसे, स्वयंसेवक इत्यादी) देऊ इच्छिणा-या लोकांची यादी.

६. लोकांचा प्लॅटफॉर्म: या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांना त्यांच्या माहितीतल्या मदतकार्याची भर घालता येईल. तसेच स्वतःला देणगी द्यायची असेल तर त्याचीही नोंद करता येईल.

७. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्लॅटफॉर्म उपलब्ध.

या प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करता येईल?

१. जर तुम्ही गरजूंपर्यंत पोहचून प्रत्यक्ष मदतकार्य करत आहात, तर तुमच्या भागामधील देणगीदार आणि इतर मदतकार्ये यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. त्यांच्यासोबत भागीदारी करता येईल.

२. जर तुम्ही मदतकार्यासाठी देणगी (पैसे, धान्य, वस्तू, इतर.) देऊ इच्छिता, तर तुमच्या भागात चालू असणा-या किंवा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणा-या मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. तुमच्या पसंतीस पडलेल्या मदतकार्याला देणगी देता येईल.

३. जर तुम्ही स्वतः गरजू आहात किंवा गरजूंच्या संपर्कातील व्यक्ती आहात, तर तुमच्या भागातील मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

४. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, मेल इ. माध्यमातून तुमच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत या वेबसाईटबद्दल माहिती पोचवता येईल.

प्रदीप देवकाते, ऋतगंधा देशमुख, प्रवीण डोणगावे, निखिल जोशी, सायली तामणे, रविकांत पाटील, सनत हानी आणि सुजय काकरमठ या तरूणांनी एकत्र येऊन वेबसाईटची निर्मिती केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना रविकांत म्हणाला, “कोरोनाच्या संकटामुळे सरकारला लोकडाऊनचा अवघड निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या अचानक वाढलेल्या अडचणी दिसू लागल्या. त्याचबरोबर त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणारे व्यक्ती, गट, संस्था, प्रशासन दिसत होते. ह्यांना एकमेकांशी जोडलं तर मदतीचा वेगाने गुणाकार होईल असा वाटलं. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपयोगी येऊ शकतो अशी खात्री वाटली. म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म बनवायचं काम हाती घेतलं.”

Video:कोरोना होऊनही ”टेंशन घेऊ नको रे मित्रा!”म्हणणाऱ्या ‘त्या’ पोलिसाला रितेश देशमुखचा सलाम

मुंबई । एरवी सभा, मिरवणूक, उत्सवात ड्युटी बजावणारे पोलीस कोरोनाच्या जीवघेण्या संकटात सुद्धा रस्त्यावर ऑन ड्युटी २४ तास आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत असताना मुंबई पोलीस दलातील अनेक योद्ध्यांवरही कोरोनाने हल्ला केला आहे. मात्र अशा परिस्थितीतही त्यांची जिद्द मात्र कायम आहे. याची अनुभूती देणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

मुंबई पोलीस दलातील एका २९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच त्याला रुग्णालयात जाण्यासाठी एक रुग्णवाहिका आली. मात्र, रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी तो जे वाक्य बोलला ते मुंबई पोलिसांची जिद्द आणि त्यांच्या कणखरपणाचे दर्शन घडवणारे होते. हा पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी एकच वाक्य बोलला ते म्हणजे, “काही टेंशन घेऊ नको रे मित्रा”, या त्याच्या वाक्यानं कोरोनाच्या लढाईत मुंबई पोलिसांचे मनोधर्य आणखी वाढल्याचं मुंबई पोलिसांच्या ट्विटवरून कळते आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या या योद्ध्याचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या आमच्य २९ वर्षीय योद्ध्याने जे आम्ही सांगायचा प्रयत्न करत आहोत ते थोडक्यात सांगितलं आहे”.

हा व्हिडिओ आणि या पोलीस कर्मचाऱ्यांची जिद्द पाहून बॉलीवूडमधील मराठमोळा स्टार रितेश देशमुख सुद्धा भारावून गेला. रितेश देशमुखने हा व्हिडिओ रिट्विट करत मुंबई पोलिसांना कडक सलाम केला आहे. दरम्यान, करोनाविरोधातील लढाईत आरोग्य कर्मचारी आणि पोलीस सर्वात आघाडीवर राहून लढत आहेत. आतापर्यंत राज्यातील जवळपास १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त पोलीस मुंबईतील आहेत. तर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लढाईत बलिदान दिल आहे. यानंतर पोलीस खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेत ५५ हून जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचा आदेश दिला आहे. त्यांना पोलीस बंदोबस्तास न येण्यास सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

सोलापुरात १०२ कोरोना बाधित, एका दिवसात सापडले 21 रुग्ण

सोलापूर प्रतिनिधी । शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून, आज एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. बैठक संपल्यानंतर त्यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसराला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

ताज्या आकडेवारीनुसार सोलापुर जिल्ह्यात सध्या 102 कोरोनाबाधित असून त्यापैकी 06 जणांचा मृत्यू झालेला आहे. सोलापुरात कोरोना चाचणीची संख्या अधिक असल्याने अधिक रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट आता पॉझिटिव्ह येत असून आता पॉझीटीव्ह येत असलेले रुग्णाना प्रशासनाने पूर्वीपासूनच उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी काळजी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.

लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या घरवापसीसाठी शासनाच्या धोरणाची ‘अशी’ होणार अंमलबजावणी

पुणे प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार केली जाईल. राज्य शासनामार्फत संबंधित राज्याशी संपर्क साधून त्यांना त्या-त्या राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होईल. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नसलेल्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल.

ज्यांना परत जावयाचे आहे, त्या व्यक्तींना वाहनांची व्यवस्था स्वत: करावी लागेल. या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद असलेला ट्रान्झीट पास वाहनांकडे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यात सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम वाहतुकीला वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच वाहनात देखील सोशल डिस्टंन्सिंग पाळूनच नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली जाईल.

महाराष्ट्र राज्या बाहेर अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त समन्वय ठेवून निर्णय घेतील. परराज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतर सबंधित जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार या नागरिकांना घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

ऑनलाईन चोरट्यांपासून स्वत:ला कंगाल होण्यापासून वाचवा! समजून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बरेच लोक लॉकडाऊनच्या वेळी घरूनच काम करत आहेत.अशा परिस्थितीत “ऑनलाइन फसवणूक” टाळणे हे देखील खूप महत्वाचे आहे.हॅकर्स फक्त आपल्या चुकीच्या प्रतीक्षेत आहेत.

हॅकर्सच्या युक्तीमुळे आणि लोकांच्या फक्त काही चुकांमुळे फोन चालवून लोक लाखोचे नुकसान करून घेत आहेत अशी बरीच प्रकरणे समोर येत आहेत.

परंतु काही पावले उचलून आपण या चोरांना टाळू शकता.

१- जर आपण फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साइट्सचा वापर करुन जर आपल्याकडे कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यावर सहज विश्वास ठेवू नका! खोटे किंवा बनावट लिंक्स देऊन आजकाल लोकांची फसवणूक केली जात आहे.कोणालाही पैसे ट्रान्सफर करताना,पर्सनली बोला.वेबसाइटची पडताळणी करा! अन्यथा आपण फसवणूकीचा शिकार होऊ शकता.

२-जिओ, व्होडाफोन, एअरटेल यासारख्या मोबाइल कंपन्यांच्या नावावर फ्री इंटरनेटच्या मागे जाऊ नका.रिचार्ज आणि टॉकटाइमचा मेसेज मिळाल्यास त्यावर दिलेली कोणतीही लिंक उघडू नका.कोणतीही कंपनी फ्री इंटरनेट देत नाही.येथे आपली फसवणूक होऊ शकते.

३- कोविड -१९ ची मेडिकल टेस्ट किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यासाठी गुगल कडून मिळालेल्या लिंक आणि फोन नंबरवर विश्वास ठेवू नका.खोटे क्रमांक आणि लिंक देखील गुगल वर अव्हेलेबल आहेत, म्हणून वेबसाइट खरी आहे की बनावट आहे हे वेरीफाय करन घ्या.

४-कोणाकडूनही किंवा मेसेजच्या सांगण्यावरून मोबाईल फोनमध्ये कोणतेही सॉफ्टवेअर / अ‍ॅप डाउनलोड करू नका. जेव्हा आपल्याला कोणतीही ny Desk, Team Viewer, Quick Support ची आवश्यकता असेल तेव्हाच ते डाउनलोड करा.

५- एखाद्या अज्ञात व्यक्तीने आपल्या फोनवर एसएमएसद्वारे आपल्याला पेमेंट लिंक पाठविली असेल आणि त्या खाली निळी अंडरलाइन असेल तर त्यावर क्लिक करू नका.फसवणूक करणारे या फेक वेबसाइट लिंकचा वापर करतात.

६- कुठेही पैसे मिळविण्यासाठी कोणत्याही क्यूआर कोड लिंकवर क्लिक करू नका किंवा पे बटण दाबू नका.

७- गुगलवर सर्च केलेला कस्टमर केअर नंबर वापरू नका, ज्यामुळे फसवणूकीची प्रकरणे समोर येत आहेत.

८- वेबसाइटवर जा आणि ग्राहक सेवा क्रमांक किंवा ईमेल इत्यादी वापरा.

९-कर्जमाफी बँक ईएमआयबाबत, गुगलवर शोधू नका आणि नंबरवर कॉल करा! या संदर्भात कॉलवर कोणतीही माहिती शेअर करू नका, ही फसवणूक असू शकते.

१०-केवळ अधिकृत वेबसाइटवरच भेट देऊन पंतप्रधान मदत निधीमध्ये पैसे जमा करा. या संदर्भात आलेल्या कॉलवर कोणतीही माहिती शेअर करू नका. यामुळे आपली फसवणूक होऊ शकते.सायबर गुन्हेगार तत्सम नावाचा यूपीआय आयडी वापरुन फसवणूक करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष नको..!!

लढा कोरोनाशी | सुरभी गुप्ता

३३ वर्षाचे निखिल तनेजा सांगतात, “माझ्या आठवड्याचा शेवट खूप वाईट होता” मुंबई स्थित उद्योजक आणि उत्पादक सांगतात, “आठवडाभर जेव्हा मी घड्याळाकडे पाहतो तेव्हा माझ्याकडे काहीतरी असतं ज्यावर मी लक्ष केंद्रित असतो, पण आठवड्याच्या शेवटच्या काळात मात्र माझ्याकडे काहीच करण्यासारखे नसते तेव्हा मला खूप चिंता वाटते.” ते म्हणतात, “आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाता आणि लोकांना ते सगळं करताना पाहता जे त्यांना नेहमी करायचे होते, जसे की नवीन कौशल्ये शिकणे, जुने छंद पुन्हा नव्याने जोपासणे, एखादा ऑनलाईन कोर्स करणे वगैरे तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल आश्चर्य वाटायला लागते. जेव्हा तुम्ही विचार करता की घरी सगळे आहे, तेव्हा तुम्हाला काही हरवण्याची भीती नसते. तेव्हा अलगावची भीती येते.” तनेजा गेल्या तीन वर्षांपासून सामान्य चिंताग्रस्त अस्वस्थतेसह (Generalized Anxiety Disorder) झगडत आहेत, पण गेल्या एका महिन्यात ते अनेक पटींनी वाढले आहे. “जेव्हा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते, तेव्हा चिंता निर्माण होते आणि आपण एका साथीच्या आजाराच्या मध्यभागी आहोत, आजूबाजूला सर्वत्र अविश्वासनीयता निर्माण झाली आहे.” असे ते सांगतात. त्यांचे पालक बहरीन आणि भाऊ युनायटेड स्टेट्समध्ये असताना सातत्याने त्यांना covid-१९ च्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. ते म्हणतात, “मला माहित नाही केव्हा आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होणार आहे आणि कधी आम्ही सगळे पुन्हा भेटू शकणार आहोत.” 

तनेजा एकटे नाहीत, जेव्हापासून जग कोरोना विषाणूमुळे संकटात सापडले आहे आणि देशांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे, तेव्हापासून जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्या उदयाला आल्या आहेत. “मानसिक आरोग्याच्या समस्या या covid-१९ शी समांतर सुरु असलेला एक साथीचा आजार आहे.” असे बेंगलोर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्स संस्थेच्या समूह मानसोपचार युनिटचे प्रमुख डॉ नवीन कुमार म्हणाले. भारतीय मानसोपचार सोसयटीला या उद्रेकानंतर मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांशी झगडणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी अलीकडेच घेतलेल्या सर्वेक्षणामधून या प्रकरणांमध्ये २०% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दर पाच भारतीयांच्या मागे एक भारतीय मानसिक अस्वस्थता आणि चिंतेशी झुंजतो आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात ‘निम्हान्स’च्या साहाय्याने एक मार्गदर्शिका जाहीर केली आहे, ज्यामध्ये अलगाव कसा हाताळावा आणि फेक न्यूज कशा टाळायच्या यासंदर्भात सल्ला दिला आहे. संस्थेने एका महिन्यापूर्वी एका मदतीसाठी संपर्कसुद्धा दिला आहे. तेव्हापासून जवळपास ११,००० कॉल आले आहेत.  देशभरातील २५० मानसिक आरोग्य तज्ञ हे कॉल स्वीकारत आहेत. सुरुवातीला लोक याला वैद्यकीय समस्या आणि तार्किक मुद्दे म्हणून व्यक्त करतात पण भय, घाबरून जाणे, चिंता आणि परिस्थितीबद्दल काळजी या येथील प्रमुख समस्या आहेत. डॉ कुमार सी म्हणाले, “जेव्हापासून बाह्यरुग्ण विभाग बंद आहे, तेव्हापासून लोकांना प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी देखील मदत मिळत नाही.” 

नेहमीच्या मदतकेंद्रांशिवाय टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) मुंबई, यांनी covid-१९ च्या दरम्यान समाज-मानसिक मदत पुरविण्यास सुरुवात केली आहे. “ही मदत मानसिक आरोग्य, कौटुंबिक हिंसाचार, घरगुती संघर्ष, अन्न मिळवणे किंवा प्रिस्क्रिप्शनशी संबंधित असू शकते. आमचे स्वयंसेवक तामिळ, मल्याळम, गुजराती आणि कोंकणीसोबत नऊ भाषांमध्ये बोलतात.” असे प्रकल्प समन्वयक, तनुजा बाबरे यांनी सांगितले. हा समूह दिवसभरात १०० कॉलना उत्तर देतो. या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्याच्या असमर्थतेचा परिणाम जगभरातील लोकांवर होतो आहे. जर्मनीच्या Hesse राज्याचे अर्थमंत्री Thomas Schaefer यांचा मृत्यू देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये झाला. covid-१९ चे पुढे जाऊन होणाऱ्या परिणामांमुळे अर्थव्यवस्था कोसळण्याच्या काळजीने त्यांनी एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली.  भारतामध्ये आंध्रप्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यातील ५० वर्षीय व्यक्तीने अगदी देशात या प्रकरणांची नोंद होण्यास सुरुवात होण्यापूर्वी त्याला covid-१९ झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा फेब्रुवारीच्या सुरुवातीला जीव घेतला. दिल्लीमध्ये २३ वर्षांच्या व्यक्तीने मार्चमध्ये सफदरगंज रुग्णालयात मृत्यूसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारली. सिडनीवरून परत येत असताना विमानतळावर डोकेदुखीची तक्रार केली असता, त्यांना अलगाव विभागात दाखल करून विषाणूची चाचणी करण्यात आली होती. शेवटी त्यांचा अहवाल नकारात्मक आला. 

मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी पुन्हा या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आल्याची चिंता आणि काळजी वाटत असल्याची कबुली दिली आहे. “चिंता, अस्वस्थता, अनिवार्य वेडाची अस्वस्थता (obsessive compulsive disorder) आणि मानसिक अस्वस्थता असणाऱ्या लोकांसाठी नक्कीच खूप वाईट आहे. गंभीर चिंता असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप वाईट होईल या भीतीने जगणे खूप सामान्य आहे. या आजाराच्या उद्रेकाने केवळ त्यांची लक्षणे विस्तारित झाली आहेत. हे रुग्ण आता या भीतीमध्ये आहेत की एकतर त्यांना संक्रमण होईल किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना. “दिल्ली येथील मॅक्स आरोग्यसेवेच्या क्लीनिकल मानसशास्त्रज्ञ, अनुप्रिया सरकार म्हणाल्या. जग या संकटाला सामोरे जात असताना स्वतःच्या समस्या त्यांच्यासमोर व्यक्त करत असताना त्यांच्या काही रुग्णांनी खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मी त्यांना सांगते केवळ खूप मोठी समस्या आहे म्हणून त्यांना जे वाटते आहे ते अवैध ठरत नाही. दिल्लीच्या बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लामसलत मानसतज्ञ, डॉ श्वेतांक बन्सल म्हणाले, याचा काय परिणाम झाला, रुग्णांनी त्यांच्या प्रगतीच्या एक पाऊल मागे जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, “सामान्यतः उपचाराचा भाग म्हणून आम्ही आमच्या रुग्णांना अशा आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये त्यांचे नकारात्मक विचार जे ते त्यांच्यासाठी रंगवतात आणि वास्तववादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतात अशा विचाराना प्रयत्नपूर्वक थांबविण्यास सांगतो. या आजाराच्या उद्रेकामुळे त्यांच्यासमोर खूप वाईट परिस्थिती आहे, आणि यामुळे त्यांच्या काळजीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच विशेषतः जीएडीच्या संदर्भात हे उपचार निष्फळ ठरतात. स्वच्छतेची सक्ती असलेल्या 
एखाद्याला व्यक्तीला “उद्भासन आणि प्रतिबंध प्रतिसाद” यासह सामान्य उपचार दिले जातात. रुग्णांना कृतीतून मुक्त ना होता पुन्हा स्वतःबद्दल विचार करण्यास शिकविले जाते. “आम्ही त्यांना हात न धुण्यास सांगतो. उदाहरणार्थ परिणामी चिंता सहन करतो. पण त्यांच्यासाठी आता आरोग्यशास्त्र आणि स्वच्छतेची सक्ती या दोन्हीमध्ये रेषा मारणे कठीण झाले आहे.” डॉ बन्सल म्हणाले. 

जेव्हा covid -१९ साथीचा आजार म्हणून घोषित करण्यात आला आणि वारंवार हात धुण्याची मार्गदर्शिका काढण्यात आली तेव्हा दिल्लीतील मानसशास्त्रज्ञ डॉ संजय छग यांना obsessive compulsive disorder च्या प्रकरणांमध्ये वाढ होईल हे अपेक्षितच होते. ते योग्य सिद्ध झाले. ते म्हणाले, जर कुणी दिवसातून वीस वेळा त्याचे हात धूत होता तो आता दिवसातून ५० ते १०० वेळा हात धुतो आहे. काही प्रकरणांमध्ये तर रुग्ण वॉशबेसिन 
पासून दुसरीकडे जायलाच तयार नाहीत.” त्यांच्या मते या उद्रेकामुळे obsessive compulsive disorder च्या रुग्णांचा त्यांच्या चिंता या खऱ्या ठरत असल्याचा समज आणखी दृढ झाला आहे. त्यांनी वेडेपणाचा मनोविकार (Paranoid Psychosis) असणाऱ्या एका रुग्णाचे उदाहरण दिले, ज्याची लक्षणे या साथीमुळे तीव्र झाली आहेत. त्यांनी सांगितले,  “त्याला असा भ्रम होतो आहे की लोक त्याला कोरोना विषाणूने संक्रमित करू पाहत आहेत.”  गेल्या काही वर्षांपासून दिवसभरात ३० वेळा हात धुणे ही  अभिषेक गुप्ता (नाव बदलले आहे) यांच्यासाठी एक नियमितता झाली आहे. “या साथीच्या आधीही मी एखाद्या अशा वस्तूला स्पर्श केला जी मला घाण वाटते तर हात धूत होतो, मग ते काहीही असो एखादी तेलकट वस्तू किंवा कपड्याचा तुकडा. मी अगदी जे लोक मला जे लोक स्वच्छ वाटायचे नाहीत त्यांच्यापासून खूप सामाजिक अंतर पाळायचो.” काही वर्षांपूर्वी 
obsessive compulsive disorder चे निदान झालेली ३२ वर्षीय व्यक्ती सांगते. अलीकडेच दिल्लीतील पॅरालिगलला सर्दी झाली, त्याने अत्यंत भीतीने त्यावर मात केली. त्यांनी सांगितले “मी २४ तासात काय काय केले त्या सगळ्याचा विचार केला, मला आठवले मी लाईची (लाईची नावाचे फळ)चा रस एका दुकानातून बांधून आणला होता. ज्याच्याकडून मी कधीच आणत नाही, पण यावेळेस आजूबाजूची सगळी दुकाने बंद असल्याने मी टाळू शकलो नाही.” तिथून तो मागे जाऊन विचार करू लागला, तो म्हणाला “मला खूप चिंता वाटायला लागली, जर ते चीन मधून पॅकबंद होऊन आले असेल तर, म्हणून त्याच्यामुळे मला संक्रमण झाले होते.  मी फार काळ वाट बघू शकलो नाही, दुकानात जाऊन दुसरे पॅकेट घेऊन आलो म्हणजे मला इतर तपशील तपासता येऊ शकले असते.शेवटी मला तो लाईची रस भारतात ओडिसा आणि उत्तरप्रदेशमध्ये पॅकबंद केल्याचे सापडले. मला मी मूर्ख असल्याचे वाटले पण त्यावेळी इतर काही कामाचे नव्हते.”  

खूपशा लोकांना त्यांच्या नियमित कामाच्या स्वरूपाचा आराखडा दरदिवसासाठी दिला जातो. पण आता संचारबंदीमुळे आराखडा नसल्याने लोकांना अडचणीचे वाटते. बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास होतो आहे. संचारबंदीच्या आर्थिक घसरणीचा सुद्धा बऱ्याच जणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, आणि केवळ पूर्वीपासून पीडित असणाऱ्या लोकांवरच नाही तर ज्या लोकांचा अशा कोणत्याच प्रकारचा वैद्यकीय इतिहास नाही अशा लोकांवर सुद्धा याचे परिणाम होत आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक निधी यांनी अलीकडेच या साथीमुळे जागतिक मंदीवर २००८ मध्ये झाला होता त्यापेक्षाही खूप वाईट परिणाम होणार असल्याचे घोषित केले आहे. पगारातील कपात आणि ताळेबंदीची खूप जणांना काळजी वाटते आहे. तनेजा जे ऑनलाईन कन्टेंट निर्मितीचे व्यासपीठ युवाचे काम करतात, त्यांनाही त्यांच्या व्यवसायाच्या भविष्याची काळजी वाटते आहे. ते म्हणतात, “सर्व सुरु असणारे संवाद बंद झाले आहेत, कोणत्याच कंपनीला त्यांना त्यांचे पैसे आता का खर्च करायचे आहेत याची कल्पना नाही.” 

२४ मार्चला जेव्हा देशव्यापी संचारबंदी जाहीर झाली, तेव्हा बऱ्याच मानसिक व्यावसायिकांनी त्यांची सत्रे ऑनलाईन सुरु केली. काहींनी समूह सत्र सुरु केली ज्यामुळे लोकांना एकमेकांना मदत करता येऊ शकेल. दिल्लीतील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ 
नुपूर डी पैवा सांगतात, “तुम्ही लोकांच्या चिंतेचे प्रमाण व्हाट्स अप समूहांवरून घेऊ शकता. साखळीने एकच संदेश पुढे पाठवून लोक त्यांच्या चिंता कमी करत आहेत, पण परत खूप जास्त चिंता पसरवली जाऊन ते स्वतःलाच खाद्य देत आहेत.”  बाबरे यांनी सांगितले टीआयआयएस मधील मदतकेंद्राच्या कॉलचे  स्वरूप संचारबंदीनंतर बदलले आहे. त्या म्हणाल्या, “सुरवातीची भीती आणि काळजी आता अतिदक्षतेशी संबंधित मिळालेल्या बातम्यांमध्ये विकसित झाली आहे.”  तनेजा त्यांच्या सल्लागाराच्या सल्ल्यावर सांगतात, “रोज सकाळी मी पहिल्यांदा वर्तमानपत्र वाचत होते, पण ती सवय सुरु ठेवणे खूप अवघड झाले आहे, कारण गोष्टी खूप लवकर बदलत आहेत.”  ते आता दिवसातील केवळ ३० मिनिटे बातम्या वाचतात. यामुळे त्यांना बातम्यांच्या चक्रामुळे वाटणाऱ्या चिंतेशी यशस्वी झुंज द्यायला मदत होते आहे. त्यांनी त्यांचा स्क्रीनचा वेळ ही  कमी केला आहे. ते सांगतात, “सतत ऑनलाईन  राहण्याचा थकवा येऊ लागल्याने फोनशी संबंधित नसलेल्या लिखाण आणि वाचन या कियांवर मी भर दिला आहे.” डॉ बन्सल सांगतात, सोशल मीडियापेक्षा  विश्वासार्ह बातम्यांवर अवलंबून राहणे महत्वाचे आहे.  ते त्यांच्या रुग्णांना दिवसाचा आराखडा देऊन सल्ला देत आहेत. ज्यामध्ये कार्यलयीन  नियमितता दिली आहे उदाहरणार्थ अगदी ते कमी तासात झाले तरी. ते सांगतात, “याची आपली झोपेची आणि अन्न साखळी नियमनासाठी मदत होते.” एकटे राहणाऱ्या लोकांसाठी भावनिक समर्थन व्यवस्थेच्या अभावामुळे विशेषतः कठीण झाले आहे. बेंगलोर स्थित, २९ वर्षीय अभिरक्षक, रिद्धी दोषी (नाव बदलले आहे) संचारबंदीच्या काळात संवेदना हरवण्यासंदर्भात बोलतात. त्या म्हणतात, “शेवटच्या आठवड्याच्या शेवटी मी Gilmore Girls सलग २१ तास बघून संपवले. मी केवळ पाणी प्यायला आणि माझ्या मांजरांना खायला द्यायलाच उठले होते. खूप मुश्कीलीने काहीतरी शारीरिक क्रिया केली असेल कोणत्याच उत्तरदायित्वाची संवेदना नव्हती. अलीकडेच माझे ब्रेकअप झाले होते आणि माझ्या कंपनीने पगार कपात घोषित केली आहे. आम्हाला त्याची व्याप्ती देखील सांगितली नाही. बॉसने एकदाही आमच्यासोबत कोणत्याच क्रियाशील नियोजनाची चर्चा केली नाही किंवा तपासणीही  केली नाही. कधी कधी मला वाटते माझ्या डोक्याचा स्फोट होईल.”

कुटुंबासोबत राहणाऱ्यांच्या त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. नोएडास्थित दिव्या पराशर नोंद करतात, जशी कुटुंबे घरीच आहेत तसे संघर्ष वाढले आहेत. “अचानक प्रत्येकजण एकमेकांच्या स्पेसमध्ये आले आहेत. वडिलांना पालकत्व हाताळण्याच्या काही कल्पनाच नाहीत, संवाद तुटतो आहे.” त्या सांगतात, “ज्यांना सामाजिक जीवनाची सवय झाली होती त्यांना या खंडाशी कसा व्यवहार करायचा हे माहित नाही. लोकांना आर्थिक प्रतिकूल प्रतिक्रियांचीही काळजी वाटते आहे.” दरम्यान संचारबंदीमधील मध्यमार्ग म्हणून लोक काहीतरी उत्पादक करण्यावर खोल लक्ष केंद्रित करीत आहेत. जे काम करायला एक दिवस लागत होता त्यासाठी आता दिन दिवस लागत आहेत. काहींना काम केल्यासारखेच वाटत नाही असे ते सांगतात. दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही जे केलं नाही त्याच्याकडे पाहता तेव्हा अपराध्यासारखे वाटते. तनेजा उत्पादकतेच्या गोष्टीला काळजी संबोधत आहेत. “लोकांमध्ये आमच्याकडे जास्त वेळ आहे, आम्ही जास्त काम करू शकतो अशा संवेदना निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकाने या उन्हाळ्याच्या सुट्ट्या नसून एक संकट आहे हे जाणले पाहिजे.” असे ते म्हणतात. 

तथापि संचारबंदीची सकारात्मक बाजूदेखील आहे. “काही लोक त्यांना कसे पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटत आहे त्याबद्दल बोलत होते. त्यांच्या नोकऱ्या खूप तणावपूर्ण आहेत आणि त्यांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. पण आता जेव्हा ते घरातून काम करत आहेत तेव्हा त्यांना यापूर्वी किती अस्वस्थतेत काम करावे लागायचे हे जाणवते आहे.” चेन्नईस्थित समुपदेशक महानंदा बोहिदर सांगतात. बेंगलोर स्थित Hank Nunn Institute, a not profit mental health organization च्या मानसशास्त्रज्ञ ईशानी बडियाल सांगतात, असे बरेच जण ज्यांना अगोदर उपचार घेण्यासाठी किंवा शोधण्यासाठी वेळ नव्हता ते आता थोड्याशा गोंधळलेल्या अवस्थेनेही पोहोचत आहेत. सरकार म्हणतात, त्या त्यांच्या रुग्णांना काळजी करण्याच्या वेळेचा एक भाग दिवसभरातील एका वेळेसाठी बाजूला काढून ठेवा. अगदी ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या नाहीत त्यांसहित  सर्वांसाठीच ही खूप कठीण वेळ असल्याचे बोहीदर कबूल करतात. त्या त्यांच्या रुग्णांना रोजच्या नियमिततेत थोडे सौम्य क्षण जसे की घरातून काम करण्याच्या दिवशी विशिष्ठ कार्यक्रमांसाठी वापरणारा परफ्युम लावणे किंवा शाळा, महाविद्यालयातील  आवडत्या गाण्यांची एखादी यादी बनविणे सारख्या क्षणांना समाविष्ट करण्याचा आग्रह करतात.  “मी माझ्या रुग्णांना असेही सांगते जर तुम्ही काहीच करत नसाल आणि केवळ संचारबंदीमध्ये जगण्याचा प्रयत्न करीत आहात तरी ठीक आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, काही गोष्टी न केल्याबद्दल तुम्ही स्वतःला जज करता कामा नये.” असे त्या म्हणतात.

सुरभी गुप्ता यांच्या ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील रविवारच्या पुरवणीतील लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारात आलिया, करीना, सैफ आणि अभिषेक यांची उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले.आलिया भट्ट, करीना कपूर खान, सैफ अली खान, आधार जैन आणि अभिषेक बच्चन यांनी अभिनेता ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारात रणबीर कपूरचे सांत्वन केले.मुंबई शहरातील चंदनवाडी स्मशानभूमीत आज दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सकाळी ६७ वर्षीय ऋषी कपूर यांचे निधन झाले.त्यांच्यावर एथिल विद्युत चेंबरमध्ये दहन करण्यात आले.

Rishi Kapoor's funeral, Alia, Kareena, Saif and Abhishek

कर्करोगाशी बराच काळ झुंज दिल्यानंतर गुरुवारी सकाळी अभिनेते ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.एका निवेदनात, त्याच्या कुटुंबीयांनी याची पुष्टी केली की, “आमचे प्रिय ऋषी कपूर यांचे रक्ताच्या आजारपणाने दोन वर्षांच्या लढाईनंतर आज सकाळी ८.४५ वाजता रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयाचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शेवटपर्यंत त्यांनी आमचे मनोरंजन केले. “

Rishi Kapoor's funeral, Alia, Kareena, Saif and Abhishek

ऋषी कपूरच्या शेवटच्या क्षणी त्यांची पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबत होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाचा कार विक्रीला फटका; एप्रिल महिन्यात एकही नवी कार विकली गेली नाही..

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आर्थिक संकट गडद झाले आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्व व्यवहार ठप्प असून सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे ऑटो क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. याचा अंदाज केवळ या गोष्टीवरून लावता येऊ शकतो कि, गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर एकाही गाडीची विक्री झाली नाही आहे. इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने ही माहिती दिली आहे. इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की, संपूर्ण महिन्यात एकही कार विकली गेली नाही. देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार मारुती सुझूकीपासून ते लग्झरी कार मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, स्कोडापर्यंत एकाही कंपनीची कार विकली गेली नाही.

संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं हा लॉकडाऊन आणखी किती दिवस लांबणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट होताना दिसत नाही आहे. अशावेळी पुढील महिन्यात सुद्धा देशात कारची विक्री होईल की नाही माहिती नाही असा अंदाज ऑटो इंडिस्ट्रीजमधील संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. भारतातील आणि अन्य आघाडीच्या ऑटो क्षेत्राला कोरोनाचा फटका बसला असून यातून सावरणे ऑटो क्षेत्राला अवघड जाणार आहे. मे महिन्यात सुद्धा परिस्थितीत फार फरक पडलेला दिसणार नाही. अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे मारुती सुझुकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी म्हटले आहे.

स्कोडा कार कंपनीचे हेड जॅक हॉलिस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, एप्रिल महिन्यात स्कोडा कंपनीची एक कार विकली गेली नाही. गेल्या ३० वर्षात हे पहिल्यांदा चित्र पाहत आहे. मला आशा आहे की, ऑटो क्षेत्र लवकरच पहिल्यासारखे सुरळीत सुरू होईल. कोरोना व्हायरसने देशभरात पाय पसरल्यानंतर मार्च महिन्यापासून ऑटो क्षेत्राला याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात जास्त कार विकणाऱ्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत मार्च महिन्यात ४६ टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आता हीच घसरण या महिन्यात एकही कार विक्री न झाल्यानं १०० टक्के पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”