Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 614

शास्त्रज्ञांनी समुद्राखालील नकाशासह उलगडले राम सेतूचे रहस्य, जाणून घ्या सविस्तर

Ramsetu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रामसेतू हा शतकानुशतकापासून प्रचलित आहे. आता या रामसेतूबाबत एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थांनी ॲडम्स ब्रिजच्या बुडलेल्या संरचनेचे मॅप तयार केलेले आहे. हा ॲडम्स ब्रिज म्हणजेच रामसेतू आहे. हा पूल भारतश्रीलंका यांना जोडला जातो. हा प्राचीन पूल भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील खूप प्रचलित आहे.

संशोधकांनी नकाशा तयार केला

संशोधकांनी ऑक्टोबर 2018 ते 2023 या कालावधीत बुडलेल्या संपूर्ण लांबीचा दहा मीटर रिझर्वेशनचा नकाशा तयार केलेला आहे. त्यानंतर त्याचे तपशील देखील केलेले आहे. तपशिलावर पाण्याखालील नकाशावर वरून धनुष्य कोडी ते तलाई मन्यारपर्यंत पूल दिसत आहे. त्यातील तब्बल 99.98% भाग हा उथळ पाण्यात बुडालेला आहे. इस्रोमधील शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहातून लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून हा नकाशा तयार केलेला आहे.

या ब्रिजच्या बुडालेला संरचनाला ईस्ट इंडिया कंपनीने ॲडम्स ब्रीज असे नाव दिलेले आहे. हा रामसेतू म्हणून भारतीयांनी वर्णन केलेल्या रचनेचा उल्लेख रामायणात केलेला आहे. रामाच्या सैन्याने रावणाच्या राज्यात म्हणजे श्रीलंकेत सीतेला वाचवायला जाण्यासाठी हा पूल बांधला गेल्याचे म्हटले जात आहे.

इसवी सनाच्या नवव्या शतकातील या पुलाला सेतू बांधाई किंवा समुद्रावरील पूल असे म्हटले जात होते. रामेश्वर मधील मंदिराच्या नोंदीनुसार 1480 पर्यंत हा पूल समुद्रसपाटीपासून उंच होता.

Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे, याबाबतचे नियोजन रेल्वे विभागाकडून केले जात असून रेल्वे येत्या दोन आर्थिक वर्षात 10,000 बिगर वातानुकूलित डबे तयार करणार आहे. त्यामुळे जनरल डब्यातून सुद्धा धक्का बुक्की न होता आरामदायी (Indian Railway) प्रवास करता येणार आहे.

मंगळवारी एका निवेदनात ही माहिती देताना उत्तर रेल्वेने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा वाढवणे हा आहे. पुढील दोन वर्षांत 10,000 बिगर वातानुकूलित डबे तयार झाल्यानंतर एकूण प्रवासी (Indian Railway) डब्यांमध्ये त्यांचा वाटा 22 टक्क्यांनी वाढेल.

कोचचे केले जाणार वर्गीकरण (Indian Railway)

2024-25 या आर्थिक वर्षात, रेल्वे 32 पार्सल व्हॅन आणि 55 पॅन्ट्री कारसह सामान्य श्रेणीचे 2,605 डबे, स्लीपर क्लासचे 1,470 डबे आणि SLR (गार्ड आणि अपंगांसाठी राखीव) श्रेणीचे 323 डबे तयार करणार आहेत. निवेदनानुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या अमृत भारत कार्यक्रमांतर्गत गाड्यांसाठी जनरल, स्लीपर आणि एसएलआर कोचचाही (Indian Railway) समावेश आहे.

त्याचप्रमाणे 2025-26 या आर्थिक वर्षात 2,710 सामान्य श्रेणीचे डबे, 1,910 स्लीपर क्लास कोच, 514 SLR डबे, 200 पार्सल व्हॅन आणि 110 पँट्री कार तयार करण्यात येणार आहेत. निवेदनानुसार, “विनावातानुकूलित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशा आणि चांगल्या सुविधा सुनिश्चित करणे आणि प्रवाशांच्या बदलत्या गरजा आणि हंगामी चढउतारांच्या अनुषंगाने आराम आणि उपलब्धता वाढवणे (Indian Railway) हे रेल्वेचे लक्ष आहे.”

नवीन रेल्वे डब्यांच्या बांधणीमुळे, रेल्वे मोठ्या संख्येने प्रवाशांना कन्फर्म तिकीट प्रदान करण्याच्या स्थितीत असेल. त्यामुळे प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागणार नाही. विशेषत: सण आणि सुट्टीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होऊन बसते (Indian Railway) तसे होणार नाही. ट्रेनमध्ये जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या कमी असल्यानेही समस्या वाढत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने बिगर वातानुकूलित श्रेणीचे डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Earth Like Planet | पाणी, माती आणि ऑक्सिजन असलेला नवीन ग्रह सापडला? पाहून शास्त्रज्ञही हैराण

Earth Like Planet

Earth Like Planet | आपले विश्व खूप मोठे आहे. त्यातील केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आढळते. परंतु पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आढळते का? कुठे ऑक्सिजन आणि पाणी मुबलक प्रमाणात आहेत का? याचा शोध मानव गेला अनेक वर्षापासून घेत आहे. परंतु आता शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर सापडण्याच्या दिशेने जात आहेत. कारण एका संशोधनातून असे संकेत देखील आलेले आहे. संशोधक हे सौरमालेबाहेरील जीवसृष्टी कोणत्या ग्रहावर आहे? किंवा कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी राहू शकते याचा शोध घेत आहे? नुकताच त्यांनी एक ग्रह (Earth Like Planet) शोधून काढला आहे. ज्या ग्रहावर बर्फ असल्याचे सांगितलेले आहे. या ग्रहाचे नाव LHMS 1140 B असे आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 48 प्रकाश वर्ष एवढा दूर आहे.

कसा आहे ग्रह ? | Earth Like Planet

LHMS 1140 B हा ग्रह लाल बटू ताऱ्याभोवती भ्रमण करत आहे. हा तारा आकाराने सूर्यापेक्षा खूपच लहान आहे. जीवसृष्टी या ग्रहावर तग धरू शकते. असा अंदाज बांधला जात आहे. या ग्रहावरील तापमान पाणी द्रव्य विस्तारित राहील एवढा आहे. त्यामुळे जीवनसृष्टी निर्माण होण्यास इथे चांगला वाव आहे.

या ग्रहाच्या वजनाबद्दल आणि त्याच्या भ्रमण कक्षाबद्दल पुरेशी माहिती आलेली आहे. त्यामुळे या ग्रहाला वातावरण आहे का? हे देखील तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे जर या गृहावर जीवसृष्टी तग धरेल असे वातावरण असेल? तर हा आतापर्यंतचा सगळ्यात जवळचा ग्रह म्हणता येईल. शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षापासून असा एकदा ग्रह शोधत होते आणि आखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे.

7 वर्षापेक्षा अधिक काळापासून संशोधन सुरू

2017 मध्ये पहिल्यांदा या ग्रहाचा शोध लागला होता. तेव्हापासून सगळेजण हा ग्रह सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहासारखा तर नाही? ना असा अंदाज तयार लावत होते. या ग्रहाचे मागील अनेक वर्षापासून मानवाने तयार केलेल्या शक्तिशाली दुर्बिणीतून निरीक्षण देखील करण्यात आलेले आहे. या निरीक्षणातून हा ग्रहण नेपच्यून प्रमाणे पूर्णपणे वायुने बनलेला नसल्याचे देखील स्पष्ट झालेले आहे. या ग्रहांमध्येवरील जवळपास 10 ते 20 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे असे देखील स्पष्ट झालेले आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक शहरात विधानसभेला कोण जिंकतंय

Nashik vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शहर.. २००९ ला मनसेच्या बाजूने कौल देणाऱ्या या शहरात आता भाजपचाच शब्द अंतिम मानला जातो. शहरातील तिन्ही मतदारसंघावर सध्या भाजपचे आमदार आहेत.. मतत्वाचं म्हणजे त्यातल्या दोन महिला आमदार आहेत.. पण महायुती आणि महाविकास आघाडीमुळं अनेक पक्षांची मिसळ होऊन गेलीय.. त्यात लोकसभेला नाशिकनं खासदारकीचा कौल मशालीला म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने दिला असला तरी नाशिक शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ मात्र महायुतीच्या बाजूने राहिलाय… त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्लाला आता महाविकास आघाडी सुरुंग लावू शकते का? भाजपच्या या तिन्ही आमदारांना घेरण्याचा विरोधकांचा नेमका काय प्लॅन आहे? करंट स्टेटस मध्ये या तिन्ही जागांवर कोण निवडून येऊ शकतं? त्याचाच हा आढावा…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो नाशिक मध्यचा…. नाशिक शहराचा खरा चेहरा दाखविणारा, सर्वजाती धर्माचा प्रभाव दिसून येणारा गरीब-श्रीमंत अशी मिश्र लोकवस्ती असणारा, शहराची वाडा संकृती जपणारा, गावठाण भाग सामावून घेणारा आणि तेवढाच पुढारलेला नाशिक मध्य मतदारसंघ…महत्वाची शाळा, महाविद्यालयं. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय असा सगळाच महत्वाचा शहरी पट्टा या नाशिक मध्य मतदारसंघात येतो… 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेत नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक मध्यची निर्मिती झाली. इतर तीन मतदारसंघात नाशिक विधानसभा मतदारसंघ विभागाला गेला परंतु गाभा ‘नाशिक मध्य’ मध्येच राहिला… देवयानी फरांदे या मागील दोन टर्म या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून येतायत.. फरांदेंना विरोधकांचा नसेल इतका धोका पक्षांतर्गत आहे, असं बोललं जातं.. कारण २०१४ लाही तिकीटाच्या रस्सिखेचात गुजरातमधून सूत्र हालवत माजी महापौर राहीलेल्य देवयानी फरांदे यांनी गुजरातमधून सूत्र हालवून तिकीट मिळवल्याचं सांगितलं जातं.. २०१४ ला त्या भाजपकडून आमदार झाल्याच पण विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर मनसे तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष फेकला गेला होता…

२०१९ ला मात्र देवयानी फरांदे यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांच्या विरोधात मोठं लीड घेत दणदणीत विजय मिळवला होता.. पण काँग्रेसचा हा जुना बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसला इथं हक्काची वोटबँक नेहमीच मिळत आलीय… २००९ साली मनसेच्या लाटेवर स्वार होत या मतदारसंघातून वसंत गीते हे आमदार झाले होते.. मात्र यानंतर मनसेला या मतदारसंघात फारसा जम बसवता आलेला नाहीये.. पण सध्या भाजपचा हा मतदारसंघ सध्या डेंजर झोनमध्ये गेलाय.. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच नाशिक मध्यमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळाल्यामुळे देवयानी फरांदे यांची आमदारकी धोक्यात आली आहे.. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते हे तगडी फाईट देऊ शकतात.. दोघांच्यात असणारं कडवं वैर पाहता फरांदे चार महिने आधीच प्रचाराच्या धामधूमीला लागल्याचं मतदारसंघात पाहायला मिळतंय.. काँग्रेस शहराध्यक्ष राकेश छाजेड आणि हेमलता पाटील यांचीही नावं इच्छुकांच्या यादीत आहेत.. पण महाविकास आघाडी म्हणून विचार करायचा झाला तर गीते हे कधीही उजवे ठरतील..

दुसरा मतदारसंघ नाशिक पूर्व…. पंचवटी, नाशिकरोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ. इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस सोबतच कामगार वस्तीलाही नाशिक पूर्व सामावून घेतो.. म्हणूनच हा मतदारसंघ राजकारणासाठी चांगलाच जड जातो… २००९ ला तयार झालेल्या या मतदारसंघावर मात्र आमदारकीचा पहिला झेंडा फडकवला तो मनसेनं.. बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे आणि सहकार क्षेत्राची जाणं असणारे स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर नाशिक पूर्वचे पहिले आमदार होण्याचा मान मिळवला… २०१४ मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले… यानंतर हा मतदारसंघ भाजपचा झाला… यानंतर नाशिकच्या भाजपात ‘सबकुछ सानप’ असा प्रकार बघायला मिळाला.. सानपांनी शहरातील भाजपवर कंट्रोल ठेवला.. पण निष्ठावंतांना डावलणं, मनमानी कारभार करणं, स्थानिक स्वराज संस्थांमधील पराभव यामुळे सानपांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी चांगलीच वाढली… तर दुसरीकडे माजी आमदार उत्तम ढिकले यांचे चिरंजीव राहुल ढिकले यांचा जनसंपर्क आणि विधानसभेसाठी त्यांनी लावलेली तगडी फिल्डींग पाहता भाजपने बाळासाहेब सानपांना डच्चू देत राहुल ढिकलेंना उमेदवारी देत सेफ गेम खेळला… त्यामुळे नाराज सानपांनी एनवेळी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधत निवडणूक लढवली.. पण भाजपनं या निवडणुकीत सानपांना चारी मुंड्या चित केलं.. आणि राहुल ढिकले दणक्यात नाशिक पूर्वमधून निवडून आले.. पण निकालाला काही दिवस झाले नाही तोच बाळासाहेब सानपांनी हातातलं घड्याळ उतरवत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं.. हे कमी होतं की काय म्हणून पुन्हा सानप यु टर्न मारत आपल्या मुळ जाग्यावर म्हणजे भाजपात गेले… थोडक्यात सानपांनी आपली क्रेडीबिलीटी स्वत:च्या हाताने कमी करुन घेतली.. त्यामुळे यंदा पुन्हा राहुल ढिकलेच भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील, हे कन्फर्म आहे… अतिशय सिस्टिमॅटीक निवडणुक लढवण्यासाठी ढिकले ओळखले जातात.. त्यात लोकसभेला त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या पाठिशी मोठं लीड दिल्यामुळे ढिकले सेफ झोनमध्ये आहेत.. पण त्यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघेही उत्सुक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय.. जगदीश गोडसे, तरुण उद्योजक अतुल मते सध्या या स्पर्धेत सर्वात जास्त आघाडीवर आहेत.. पण भाजपला टक्कर देण्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील, एवढं मात्र नक्की…

यातला तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो नाशिक पश्चिमचा…. कामगार वर्गाची वस्ती म्हणून नाशिक पश्चिमची सर्वात महत्वाची ओळख. खानदेशबहुल पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मोठ्य प्रमाणावर परप्रांतीयांचंही विस्थापन झालंय… अंबड व सातापूर एमआयडीसीचा हा सगळा कामगार लोंढा याच मतदारसंघात येत असल्याने इथले नागरी प्रश्नही बरेच गुंतागुंतीचे असतात.. इथलं राजकारणही मुळात याच प्रश्नांच्या अवतीभोवती फिरताना दिसतं.. २००९ ला जेव्हा हा मतदारसंघ तयार झाला तेव्हा शिवसेनेच्या लाटेत नाशिक पश्चिममधून मनसेचे नितीन भोसले आमदार झाले.. पण २०१४ मध्ये भाजपच्या लाटेत मनसेचं शहरातील राजकारण वाहून गेलं आणि भाजप नगरसेविका सीमा हिरे मनपाच्या सभागृहातून थेट विधिमंडळात जाऊन धडकल्या… तर २०१९ ला इथं पहिल्यांदाच हिरे विरुद्ध हिरे असा संघर्ष पाहायला मिळाला.. युतीने भाजपचे स्टँडिंग आमदार सीमा हिरे यांनाच तिकीट रिपिट केलं.. तर तर राष्ट्रवादीकडून अपूर्व हिरे यांनी अपयशी फाईट दिली… आणि पुन्हा एकदा भाजपच्या सीमा हिरे यांनी आमदारकीचा गुलाल उधळला… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदासंघात युतीच्या उमेदवारालाच या मतदारसंघातून लीड मिळालं असलं तरी २०१९ चा विचार करता ते कमालीचं घटल्यानं ही सीमा हिरे यांच्यासाठी धोक्याची घंटी ठरु शकते… त्यात यंदा महायुतीतील इच्छुकांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यानं ही हीरेंसाठी डोकेदुखी ठरु शकते.. कसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली तर सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.. तर दुसरीकडे मविआकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने राऊतांकडून त्यांच्या नावाचा हट्ट नाशिक मध्यसाठी धरला जाऊ शकतो… पण महायुतीसाठी सध्या ही जागा सेफ झोन मध्ये असली तरी दगाफटका झालाच तर ही हातची जागा सुद्धा जाऊ शकते.. बाकी महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर इथली लढत निसटती होणार की चुरशीची हे ठरणार आहे… एवढं मात्र नक्की

IAF Agniveer Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, हवाई दलात भरती सुरु

IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दलाअंतर्गत एक मोठी भरती होणार आहे. ही भरती वायुसेना अग्नीवीर वायू (IAF Agniveer Bharti 2024) या पदांसाठी होणार आहे. 8 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 28 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता.

ही भरती भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू या पदासाठी सुरू आहेत. त्यामुळे त्यांना नोकरी करायची आहे. त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीची खास गोष्ट म्हणजे या भरतीसाठी केवळ अविवाहित महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. विवाहित महिला या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024

  • पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु
  • वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तुम्ही या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Konkan Railway : महत्वाची बातमी ! कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द

Konkan Railway : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मागच्या दोन दिवसांमध्ये कोकण विभागात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला असून गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी पाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दी सह आज बुधवार दिनांक 10 जुलै रोजी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही आज कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर आधी रेल्वेच्या या सूचना पहा आणि मगच बाहेर पडा.

मागचे दोन दिवस कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम रेल्वेवरही झाला आहे. कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यान रेल्वेच्या (Konkan Railway) भुयारी मार्गामध्ये पाणी वाहू लागलं. दिनांक 9 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार निदर्शनास आला आणि त्यानंतर सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता ट्रॅक ऑफ फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र रात्री देखील मुसळधार पाऊस असल्यामुळे आज दिनांक 10 जुलै रोजी पहाटे दोन वाजून 59 मिनिटांचा सुमारास पेडणे बोगदा मधून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागला त्यामुळे प्रवासांच्या सुरक्षे खातच खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वे कडून या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द (Konkan Railway) करण्यात आल्या आहेत. याबाबतची नोंद सर्व प्रवाशांनी घ्यावी असा आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नक्की काय घडले? (Konkan Railway)

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस (Konkan Railway) सावंतवाडी पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस ,दिवा एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगला एक्सप्रेस चा मार्ग बदलून तो पनवेल -लोणावळा -पुणे -मिरज- लोंढा- मडगाव असा करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही कोकण रेल्वेचा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी पहा आणि मगच बाहेर पडा.

ITR filing | ITR रिटर्न भरण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा; होणार नाही कोणतेही नुकसान

ITR filing

ITR filing | आर्थिक वर्ष 2023- 24 या वर्षातील प्राप्तिकर रिटर्न म्हणजे (ITR) भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 ही आहे. त्यामुळे तुम्हाला या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. तुम्ही अजूनही जर तुमचे रिटर्न (ITR filing) भरले नसेल तर लवकरात लवकर भरा. यासाठी काही कागदपत्रे देखील गोळा करावी लागतात. आज आम्ही तुम्हाला आपले रिटर्न भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? हे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही चुका करणार नाही आणि तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही.

कोणता आयटीआर फॉर्म निवडावा? | ITR filing

कोणता आयटीआर फॉर्म निवडावा? हे तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर अवलंबून असते. जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, कृषी उत्पन्न 5,000 रुपयांपर्यंत असेल आणि तुमच्या मालकीचे एकच घर असेल तर तुम्ही ITR-1 (सहज) वापरू शकता. जर उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR-2 निवडावा लागेल. रोख किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील स्टॉक एक्स्चेंजवरील व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नासह व्यवसाय उत्पन्न असलेल्या लोकांसाठी, ITR-3 आहे.

कोणती कागदपत्रे लागतील?

हे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आणि आयटीआर फॉर्मवर अवलंबून असेल. तुम्ही पगारदार व्यक्ती असल्यास, तुम्हाला फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, तुमच्या ब्रोकरकडून भांडवली नफा स्टेटमेंट, ऑनलाइन म्युच्युअल फंड मध्यस्थ किंवा फंड हाऊस यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

यावेळी, आयकर विभागाने या वर्षाच्या सुरुवातीला जारी केलेल्या नवीन आयटीआर फॉर्मद्वारे, विशेषत: कपातींबद्दल अतिरिक्त माहिती मागवली आहे. तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80GGC अंतर्गत राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांचे तपशील शेअर करावे लागतील. त्याचप्रमाणे, करदात्यांनी त्यांच्या अपंग अवलंबितांचे पॅन आणि आधार प्रदान करणे आवश्यक आहे जर ते कलम 80DD अंतर्गत कपातीचा लाभ घेत असतील.

कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?

तुम्ही योग्य ITR फॉर्म निवडला आहे याची खात्री करा. चुकीचा फॉर्म वापरल्याने तुमचा रिटर्न ‘रद्द’ होईल. कोणत्याही उत्पन्नाची तक्रार करण्यास विसरू नका. AIS सर्व तपशील कॅप्चर करते.

योग्य बँक खाते तपशील भरा | ITR filing

आयकर रिटर्न भरताना तुमच्या बँक खात्याचा योग्य तपशील द्या. चुकीची माहिती तुमचा परतावा रोखू शकते. जर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की मी 31 जुलै नंतर आयटीआर दाखल करू शकतो का, तर उत्तर होय आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी, तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत विलंबित रिटर्न भरू शकता, परंतु तुम्हाला 5,000 रुपये उशीरा-फायलिंग शुल्क भरावे लागेल.

आता दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द; पुणे पोलिसांचा निर्णय

drunk and drive

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून “ड्रंक अँड ड्राईव्ह”च्या (Drank And Drive) घटना वाढलेल्या आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात, आणि त्यानंतर मद्यधुंद चालकाने २ पोलिसाना सुद्धा उडवले. त्यातच मुंबईत सुद्धा वरळीमध्ये असाच काही प्रकार पाहायला मिळाला. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागलं आहे. या सर्व घटनांनी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) एक मोठा निर्णय घेतला आहे. इथून पुढे दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द करण्यात येईल. पुणे पोलिसांनी याबाबत न्यायालयात प्रस्ताव टाकला आहे.

पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर आळा घालण्यासाठीच पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. आता मात्र थेट लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. इथून पुढे जर कोणी चालक पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार आहे.

दरम्यान, काही महिन्यापासून ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना सतत पाहायला मिळत आहेत. यात बहुतांश वेळा बड्या व्यक्तीचा समावेश दिसतोय. पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. अगदी अशीच एक घटना मुंबईतील वरळीमध्येही समोर आली आहे.. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व घटनांना आला घालण्यासाठीच आता लायसन रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. सध्या तरी न्यायालयात हा प्रस्ताव टाकन्यात आला असून न्यायालय याबाबत काय निर्णय घेत ते पाहायला हवं. तसेच या नव्या नियमामुळे ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकारात घट होते का? ते पाहायला हवं.

PM जन औषधी केंद्र चालू करण्यासाठी सरकार करणार 2 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कागदपत्रांची यादी

PM Jan Audhadhi kendra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांना रोज कमवून खावे लागते. अशा परिस्थितीत जर ते आजारी पडले, तर त्यांना आजारपणाचा खर्च परवडत नाही. त्याचप्रमाणे औषधे देखील आजकाल खूप महाग झालेली आहेत. त्यामुळे औषधांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे औषधांच्या अभावाने अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. आता सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांसाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचा देखील विस्तार केला आहे. या केंद्रावर जनरिक औषधे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कमी किमतीत उपलब्ध होतात.

तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण आता केंद्र सरकार लोकांना जनरिक औषधे पुरवण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडण्याची संधी देत आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतरच तुम्हाला हे जन औषधी केंद्र उघडता येईल. आता हे प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडण्याची पद्धत काय आहे? त्यासाठी कोणत्या अटी आणि कागदपत्र लागतात? त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

जन औषधी केंद्र उघडण्यासाठी डी फार्मा किंवा बी फार्मा प्रमाणपत्र आवश्यक आहे
जनऔषधी केंद्र उघडण्याची प्रक्रिया (जन औषधी केंद्र उघडण्याची प्रक्रिया) अगदी सोपी ठेवण्यात आली आहे. मात्र, ते उघडण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या काही नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. ज्यांच्याकडे डी फार्मा किंवा बी फार्मा प्रमाणपत्र आहे त्यांनाच केंद्रे उघडण्याची परवानगी सरकार देते. यासोबतच जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुमच्याकडे १२० स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तीन श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्गात डॉक्टर, फार्मासिस्ट किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे, दुसऱ्या वर्गात ट्रस्ट, खाजगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे आणि तिसऱ्या वर्गात राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या लोकांचा समावेश आहे.

फक्त 5000 रुपयांत अर्ज करा

लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार जनऔषधी केंद्रांची संख्या वाढवत आहे. सध्या भारतात 11 हजाराहून अधिक प्रधान मंत्री जनऔषधी केंद्रे आहेत. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज करण्यासाठी, एक फॉर्म भरावा लागेल आणि 5000 रुपये शुल्क जमा करावे लागेल.

सरकार 2 लाख रुपयांची मदत करणार

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सरकार प्रोत्साहनपर पैसे देखील देते. एका महिन्यात 5 लाख रुपयांपर्यंतच्या औषधांच्या खरेदीवर 15 टक्के किंवा कमाल 15,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते. एवढेच नाही तर विशेष श्रेणीत सरकार पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2 लाख रुपयांची मदतही देते.

जनऔषधी केंद्रातून किती मिळणार कमाई?

जनऔषधी केंद्रातील औषधांच्या विक्रीवर सरकारकडून तुम्हाला २० टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जाते. यासोबतच तुम्हाला दर महिन्याला केलेल्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन मिळेल.

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

जर तुम्हाला प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी काही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र, पत्ता पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र) आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी, तुम्हाला janaushadhi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

BSNL Recharge Plan | BSNL चे नेट चालणार रॉकेट स्पीडने; कंपनीने लॉन्च केला 1000 GB डेटाचा खास प्लॅन

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | मागील काही दिवसापूर्वी देशातील लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel आणि VI यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ग्राहकांना देखील चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक युजर हे BSNL वापरण्यावर भर देत आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL पूर्ण तयारी केलेली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना अतिशय कमी दरामध्ये रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देत आहेत. आज आम्ही तुम्हाला या कंपनीच्या ब्रोडबंड ब्रँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला तब्बल 1000 GB सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे.

1000 GB डेटा मिळेल | BSNL Recharge Plan

कंपनीच्या भारत फायबरमध्ये अनेक क्लास त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये ग्राहकांना खास सुपरफास्ट इंटरनेट देखील दिले जाते. BSNL साठी 329 रुपयांच्या फायबर ब्रॉड ब्रँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 25 MBPS च्या वेगाने 1000 GB डेटा ऑफर केला जातो. त्याचप्रमाणे 399 रुपयांच्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 30 MBPS स्पीडने 1400 जीबी डेटा दिला जातो. हे प्लॅन खास करून ग्रामीण भागातील युजरचा विचार करून बनवलेले आहेत. या प्लॅनची वैधता 30 दिवसांसाठी असणार आहे.

कंपनीच्या बेसिक ब्लड बँक ग्राहकांसाठी 2 प्लॅन त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. 249 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये युजरला 50 BMPS च्या वेगाने 10 GB मिळतो. त्याचप्रमाणे डेटा संपल्यानंतर 2 MBPS च्या स्पीडने अमर्यादित डेटा वापरता येतो. याचप्रमाणे 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25 MBPS च्या स्पीडमध्ये 20 GB डेटा दिला जातो. तसेच युजर्सला दोन MBPS स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो