हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये बऱ्याच प्रांतांमध्ये लॉकडाउन सुरु झाला आहे आणि दुचाकी डबल सीट चालविण्यासही बंदी आहे. असे असूनही, लॉकडाउनचे उल्लंघन करण्यापासून लोक परावृत्त होत नाहीत. ताज्या एका घटनेत एका महिलेच्या वेषात दुचाकी चालविणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले.यापूर्वीही कराची येथून अशा घटनेची बातमी समोर आली होती, त्या युवकाने हिजाब घातला होता आणि लॉकडाउनचे उल्लंघन केले होते.
‘सिटी ४२’ च्या वृत्तानुसार चोहांगमध्ये महिलेच्या वेशात एका तरूणाला अटक केली आहे. डबल राईडिंग बंदी असूनही पोलिसांनी एका युवकास या वेशात फिरताना पाहिले तेव्हा ही विचित्र घटना उघडकीस आली. पोलिसांच्या कडक पहाऱ्यातून तो सुटू शकला नाही आणि त्याला अटक करण्यात आली.मात्र, अटक केल्यावर या युवकाने पोलिसांनी पुन्हा तसे करणार नाही,अशी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे इशारा देऊन त्याला पोलिसांनी सोडून दिले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जनतेने स्वत: ला घरातच मर्यादीत ठेवले पाहिजे. लोक सतत लॉकडाउन उल्लंघन करत आहेत.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या बर्याच प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तथापि, असे असूनही, लोक लॉकडाउनचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त होत नाहीत. बाजार व खासगी संस्था बंद असूनही नागरिकांची हालचाल थांबलेली नाही. त्याचबरोबर डबल राईडिंगवर बंदी असूनही वारंवार त्याचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहेत. पंजाब प्रांतातही कलम १४४ लागू केल्या असूनही नागरिकांकडून बेजबाबदार वागणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन