कोरोना संशयितांना शोधण्यासाठी इम्रान खान आता वापरणार ‘हि’ पध्द्त जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्येही कोरोनाव्हायरसचा कहर सुरूच आहे.या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत २३७ लोकांचा मृत्यू झाला आहे.तर ११ हजाराहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानात रुग्णांची संख्या खूप जास्त असू शकते. वास्तविक संक्रमित लोक तिथे येत नाहीत. अशा परिस्थितीत आता पंतप्रधान इम्रान खान संशयित रुग्णांना पकडण्यासाठी नवीन युक्त्यांचा वापर करत आहेत. ज्या प्रकारे पाकमध्ये दहशतवादी पकडले जातात.

आता दहशतवाद्यांसमवेत कोरोना संशयितांनाही पकडले जाईल
इम्रान खान म्हणाले की, पूर्वी हे तंत्र दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी असत, परंतु आता कोरोना रूग्णांचा मागोवा घेण्यासाठी हे वापरले जाईल. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था आयएसआय सामान्यत: याचा वापर करते.या गोष्टी त्याने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्या.या कार्यक्रमाचे आयोजन हे मदत निधी गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

टीटीक्यू वापरला जाईल
सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रणालीचा वापर करून अधिकाधिक हॉट स्पॉट्स ओळखले जातील. याला टीटीक्यू म्हणतात. म्हणजेच, ट्रॅकिंग, चाचणी आणि क्वारंटाइन ठेवणे. पाकिस्तानमध्ये याअंतर्गत अधिकाधिक चाचण्यांवर जोर देण्यात येत आहे.

काटेकोरपणे लॉकडाउन सुरु
लॉकडाऊनचे नियम बनविण्यात आले असून तो मोडणाऱ्यांना शिक्षा झाली आहे असे इम्रान म्हणाले. त्याचप्रमाणे मशिदींमध्ये एसओपीचे पालन न केल्यास उलेमा यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यासाठी शिक्षा निश्चित केली जाईल. इम्रान म्हणाले की मशिदीतील कोणतीही चूक त्वरित बंद होईल, त्यावर आता कोणतीही चर्चा होणार नाही.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment