धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून पंढरपूरच्या इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणामुळे आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. निखिल दत्तात्रय चांडोले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अवघा 24 वर्षांचा होता. त्याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याने पैठण या ठिकाणी आत्महत्या करून आपल्या आयुष्यचा शेवट केला आहे.

मृत निखिल याचे कुटुंबीय विजापूर गल्ली या ठिकाणी राहते. निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले यांचा तो एकुलता एक मुलगा होता. यावेळी पोलिसांना निखिलच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठी मध्ये त्याने ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” असे हिंदी सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या होत्या.

मृत निखिल हा पैठण या ठिकाणी शिक्षण आणि नोकरी करत होता. निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता. निखिल रविवारी दिवसपाळी करून रूमवर आला होता. यानंतर त्याने मध्यरात्री रूममधील पंख्याला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचा मित्र रूमवर आला तेव्हा हि घटना उघडकीस आली. निखिलजवळ सापडलेल्या चिट्ठीमधील मजकुरावरून त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.