“मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत चक्क डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधी देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. पण ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डीआयजी लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) यांनी राजीनामा दिला आहे.

जाखड यांनी राज्याच्या मुख्य गृह सचिवांकडे राजीनामा सोपविला आहे. जाखड यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात मुदतपूर्व रिटायरमेंट घेत असल्याचे म्हटले आहे. ”मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.”, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले देशव्यापी आंदोलन आजही सुरुच आहे. आज ट्रॅक्टरने रस्ते जाम करण्यात येणार असून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला मोठा झटका लागला आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आंदोलन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment