सुजय विखेंच्या प्रचारात उतरल्या पंकजा मुंडे

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी |अहमदनगर येथील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शेवगाव येथे पंकजा मुंडे यांची सभा पार पडली. बीड येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडल्यामुळे बहिणीच्या प्रचारात गुंतलेल्या पंकजा मुंडे राज्यभर प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत.

 शेवगाव येथील सभेत पंकजा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर जोरदार टीका केली. दोन धर्मातल ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत तर दोन जातीत सलोख्याने राष्ट्रवादीच्या पोटात दुखत अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

राजकारणात नातीगोती असतात ती सांभाळली पाहिजेत पवार आमचा परिवार एक आहे असं सांगतात माझ्या भावाला मात्र शिकवत नाहीत ते आम्हाला संपवण्याचा विडा घेतात अशी कोपखली पंकजा यांनी पवारांना मारली. मोदींवर टीका करताना देशामध्ये गरीबी संपलेली नाही असं राहुल गांधी सांगतात परंतू तुमचे पंजोबा प्रधानमंत्री.आजी प्रधानमंत्री.वडील प्रधानमंत्री दहा वर्षे पंतप्रधानाच रिमोट तुमच्या हातात तरी देखील तुम्ही विचारताय गरिबी का कमी नाही झाली असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला. मोदींना मिरवतात म्हणून टीका केली जाते यांनी काय केलय आता पर्यंत गांधी पवारांनाच मिरवतात स्वतः परिवादी आहेत आणि मोदींना परिवार वाद शिकवतात असही पंकजा म्हणाल्या.