हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संघर्ष कोणाला चुकलाय … मी थकणार नाही, मी झुकणार नाही. मी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नाराज नाही. माझं नाराज होण्याचं कारण नाही. कुणावर नाराज होणार? हे राजकारण आहे. माझ्यासमोर छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमान आहे. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे असं म्हणत त्यांनी आपली आगामी भूमिका आणि वाटचाल स्पष्ट केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्षाशिवाय नाव मिळत नाही. तसेच जोडे उचलणाऱ्यांचेही नाव होत नाही. मी कधीही उतरणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसा चालवते. अमित शहा यांचाही वारसा चालवते असे पंकजा मुंडे यांनी म्हंटल.