हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा यांनी आज अचानक पत्रकार परिषद बोलावली असल्याने पंकजा मुंडे आज काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शिंदे फडणवीस सरकारचा कार्यकाळ सुरळीत चालू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेत शिंदे गटाला आव्हान उभे केले आहे. तसेच भाजप मधील अंतर्गत विरोधी गटाला सुद्धा यामुळे फडणवीसांनी शह दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या रूपाने आता भाजपला अनेक मराठा चेहरा मिळाल्याने फडणवीसांची पक्षातील जागा मजबूत झाली आहे. मात्र या घडामोडींमुळे भाजपमधील पक्षांतर्गत कलह विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
मी 12:30 वाजता press घेईन..स्थळ माझे वरळी येथील कार्यालय …पत्ता आपल्याकडे आहेच…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2023
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्याने पंकजा मुंडेंसमोर पेच?
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवारांनि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ज्या ९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली यामध्ये धनंजय मुंडे यांचेहि नाव होते. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तगडे आव्हान उभे ठाकले आहे. यासर्व घटनेनंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याबाबत राज्यात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.