व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द, आरोपही मागे; शिंदे सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांचे निलंबन राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने रद्द केलं आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप सुद्धा सरकारने मागे घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता शिंदे सरकारने त्यांना मोठा दिलासा आहे.

परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले होते, याप्रकरणी अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच तुरुंगातही जावं लागलं होत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना ‘अनुशासनहीनता आणि इतर अनियमिततेच्या’ आरोपावरून निलंबित केले. तसेच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीही सुरू केली होती. परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. मात्र आता शिंदे फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे तसेच त्यांचा निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी केला आहे.

सरकारी आदेशात म्हंटल आहे की, ऑल इंडिया सर्व्हिसेस (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत परम बीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे आणि हे प्रकरण बंद करण्यात येत आहे, आणि त्यांचे निलंबन रद्द करण्यात येत आहे. तसेच 2/12/2021 ते 30/06/2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी हा ऑन ड्युटी मानला जाईल.