परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्यासमोर आम्ही आमचा खुलासा करू”, असे परब यांनी म्हंटले आहे.

अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा केला. ईडीच्यावतीने करण्यात येणाऱ्या चौकशीवेळी खुलासा करण्यासाठी आपण तयार आहोत. पोलिसांच्या बदलाच्या या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्यासमोर आम्ही आमचा खुलासा करू,’ असेही परब यांनी सांगितले आहे.

चौकशीत नेमके काय म्हणाले परमबीर सिंह?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनिल परब याचे नाव घेतले. मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.

Leave a Comment