मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहीती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुक न लढवण्याचे जाहिर केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांतून त्यांना निवडणुक लढवण्यासाठी विनवणी होत होती. पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनीही शरद पवारांना त्यांच्या निवडणुक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र एकाच घरातील किती जण लोकसभा लढवणार असे म्हणत पवार आपल्या मतावर ठाम होते. गुरुवारी जाहिर झालेल्या पहील्या यादीत पार्थ यांच्या नावाचा समावेश नसल्याने राजकिय वर्तुळात त्यंच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. आज पार्थ यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहिर केल्याने सर्व चर्चांना पुर्ण विराम मिळाला.
तसेच दिंडोरी मधून धनराज महाले, नाशिक मधून समीर भुजबळ, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि बीड मधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.