हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आता समोर येत आहे.
काल राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत (Pandharpur by-election) चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात असल्याने शरद पवारही त्यांना उमेदवारी देण्यास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पार्थ यांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तयार नसल्याचे बोलले जात आहे.
उमेदवार निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत पंढरपुरात एक बैठक पार पडली. मात्र यावेळी भगीरथ भालकेंना उमेदवारी ना देण्याची मागणी कार्यकर्त्यांनमधून केली गेली. बैठक पार पडल्यानंतर जंयत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पंढरपूरमधून पार्थ पवार यांच्या नावाचाही विचार करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पातळीवर पार्थ यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसा ठरावही केल्याचं सांगण्यात येत आहे. पण पार्थ यांना पंढरपुरातून उमेदवारी देण्याबाबत अजित पवार तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा