‘या’ Penny Stock ने एका महिन्यात तिप्पट नफा देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल

Penny Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Penny Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना जोरदार नफा मिळवून दिला आहे. सध्याच्या काळात Jai Mata Glass हा पेनी स्टॉक देखील असाच धमाल करत आहे. जानेवारीमध्ये आतापर्यंत यामध्ये दररोज अप्पर सर्किट दिसून आले आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना तिप्पट नफा मिळवून दिला आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

हे लक्षात घ्या कि, फक्त BSE वरच लिस्टेड असलेल्या Jai Mata Glass या कंपनीची मार्केट कॅप 16 कोटी रुपये आहे. गुरुवारी या कंपनीचे एकूण इंट्राडे व्हॉल्यूम 26,87,397 च्या पातळीवर होते. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 1.65 रुपये प्रति शेअर तर गेल्या 52 आठवड्यांचा नीच्चांक 0.36 पैसे प्रति शेअर इतका आहे. Penny Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

एका महिन्यात तिप्पट रिटर्न

गेल्या एका महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना तिप्पट रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 1 महिन्यात या शेअर्सने मध्ये 217 टक्क्यांनी यात गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत शेअर्सने गुंतवणूकदारांना 334 टक्के तर गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत सुमारे 237 टक्के आणि गेल्या 5 वर्षात 469 टक्के रिटर्न दिला आहे. Penny Stock

Multibagger Stock Proseed India Gave 26122 Percent Return In 6 Months |  Multibagger Stock Tips: मल्टीबैगर स्टॉक ने बनाया करोड़पति, 0.36 पैसा का  शेयर पहुंचा 94 रुपये पर, निवेशक हुए मालामाल

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 317,307 रुपये झाली असेल. तसेच ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्यांची गुंतवणूक आता 4.15 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असेल. त्याचप्रमाणे या शेअर्समध्ये 1 वर्षात गुंतवलेले 1 लाख रुपये आता 3.25 लाख रुपये झाले असतील. Penny Stock

A Quick Take on Penny Stocks

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे

इथे हे लक्षात घ्या कि, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हे जास्त जोखीम असते. कारण या शेअर्सच्या किंमतीवर परिणाम करणे तुलनेने सोपे असते. त्याचप्रमाणे कमी ट्रेड व्हॉल्यूममुळे हे शेअर्स खूपच अस्थिर देखील असतात. थोडी जास्त खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर या शेअर्समध्ये मोठे करेक्शन आणि रिकव्हरी दिसून येतात. तसेच छोट्या कंपन्या गुंतवणूकदारांसोबत खुंतोच कमी माहिती शेअर करतात, ज्यामुळे या शेअर्समध्ये इनसाइडर ट्रेडिंग होण्याची शक्यता देखील जास्त असते. Penny Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/jai-mata-glass-ltd/jaimatag/523467/

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार