हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक माणूस स्ट्रॉ चा वापर करून एका विचित्र दिसणार्या प्राण्याला खाऊ घालत आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला गेला होता की त्याला हा विचित्र दिसणारा प्राणी रस्त्यावर पडलेला आढळला आहे आणि त्याचे काय करावे हे त्याला कळाले नाही. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती हा प्राणी एलियन असल्याचे सांगत आहे.मात्र, जेव्हा हा व्हिडिओ काही तज्ञांपर्यंत पोहोचला तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ट्विटरवर लोक या प्राण्याची तुलना नेटफ्लिक्सवरील ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या मालिकेत दाखविलेल्या विचित्र खलनायक डेमोगॉर्गनशी करत आहेत. व्हिडिओमधील हा प्राणी खूपच लहान आहे आणि तो खूपच विचित्र दिसत आहे. हे एखाद्या प्राण्याच्या लहान मुलासारखे दिसते. काही लोक ‘वेणम’ चित्रपटाशी संबंधितही गोष्टीही सांगत आहेत.मात्र या काही कमेंट्समध्ये काही जाणकार लोक त्याला पक्ष्याचे पिल्लू देखील म्हणत आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,या व्हिडिओमध्ये पाहिले गेलेले पिल्लू हे गोल्डियन फिंच नावाच्या पक्ष्याचे आहे. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीच्या एनीमल बिहेवियर रिसर्चर क्लॉडिया हॉफमन म्हणतात की गोल्डियन फिंच नावाचा हा पक्षी सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो, म्हणून त्याची मुलं थोडी वेगळी दिसतात. या पक्ष्याला बर्याच भागात लाईव्ह टॉर्च असे देखील म्हणतात. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधक कसंद्रा टेलरच्या मते पिल्लाच्या चेहऱ्याभोवती विचित्र खुणा केल्यामुळे त्याचे वय कळून येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.