खुशखबर!! आता ‘या’ लोकांना फक्त 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून उज्ज्वला योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, इथून पुढे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर फक्त 600 रुपयांना मिळणार आहे. ज्याचा मोठा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली होती. ज्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 600 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होईल.

दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज पुन्हा या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या आगामी निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. त्यातलाच एक प्रयत्न म्हणून मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या सबसिडीमध्ये वाढ केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.