हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक लोकांना बाहेरचे खाणे जास्त आवडते. त्यातल्या त्यात चायनीज वगैरे असे पदार्थ असले कि खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चायनीज अतिप्रमाणात खाणे हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक गोष्ट असते. ज्या लोंकाना उच्चरक्तदाब आहे त्या लोकांनी चायनीज खाणे शरीरासाठी जास्त अपायकारक असते. चायनीज मध्ये जास्त प्रमाणात सोडियम चे प्रमाण आहे त्यामुळे ते शरीरासाठी जास्त अपायकारक आहे. या पदार्थांमुळे अपचन , लठ्ठपणा , मधुमेह यासारख्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. खाण्यात जर चायनीज चे प्रमाण जर जास्त असले तर ते शरीरासाठी अपायकारक आहे.
हे लक्षात ठेवा —-
१ . जरी कधी जर चायनीज खवावेसे वाटले तरी त्यामध्ये जास्त प्रमाणात पालेभाज्यांचा समावेश करावा.
२ मांसाहार टाळा .
३ चायनीज डिश या वाफेवर तयार करतात. त्यामुळे त्या शक्यतो खाणे टाळावे.
४ . सॉस चा वापर कमी करा. आहारात त्याचे प्रमाण शक्यतो टाळा.
५ . रक्तदाबाच्या लोकांनी जास्त प्रमाणात चायनीज खाऊ नये.
६ . कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्या खाऊ नयेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’