कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी एका शिवभक्ताने टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नूल येथील रहिवाशी असलेल्या सागर मांजरे हा युवक जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ या टॉवर वरती चढून बसला होता. येत्या १९ फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करावी अशी मागणी या शिवभक्ताने केली आहे. त्याच्या या शोले स्टाईल आंदोलनाचा व्हिडिओ आता चांगलाच वायरल झाला आहे.
जो पर्यंत गावकरी आपली मागणी मान्य करत नाहीत तो पर्यंत खाली आपण उतरणार नसल्याचा इशारा सागरने गावकऱ्यांना दिला. गेल्या काही दिवसांपासून महागावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहे. चौकामध्ये असलेल्या जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा बसविण्यावरून हा वाद सुरू आहे. या वाद थांबवावा असं आवाहन सदर शिवभक्ताने केले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.