Personal Finance । भविष्यातील कोणतेही आर्थिक संकट टाळण्यासाठी पैशाची बचत (Personal Finance) करणे कधीही योग्यच… पैशाची बचत केल्याने आपल्याला कोणत्याही आपत्कालीन आर्थिक अडचणीला सहजपणे तोंड देता येते. मात्र देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाई मुळे पैशाची बचत करणं हे म्हणावे तेवढे सोप्प नाही.
यावर मात करण्यासाठी SIP करणे लाभदायी ठरेल. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP द्वारे गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. SIP ची विशेष गोष्ट अशी आहे की, याद्वारे आपल्याला अगदी थोड्याशा पैशांमध्ये देखील गुंतवणूक करता येते. SIP मध्ये 500 रुपयांची देखील गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडात अशा अनेक योजना आहेत, ज्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर 12 ते 15 टक्के वार्षिक रिटर्न देऊ शकतात.
SIP चे फायदे
आपल्याला दररोज 50 रुपयांची बचत (Personal Finance) करून एका महिन्यात 1500 रुपये जमा करता येतील. जर आपण दरमहा हे 1500 रुपये SIP मध्ये सतत 5 वर्षे गुंतवले तर 90,000 रुपये जमा होतील. जर तुम्हाला यावर 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला तर आपल्याला 1.20 लाख रुपये मिळतील.
त्याचप्रमाणे, जर आपण हे 15 वर्षे चालू ठेवले तर आपल्याला 7.50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. तसेच 25 वर्षे चालू ठेवले तर ही रक्कम वाढून 28.5 लाख रुपये होईल. SIP ची आणखी एक विशेष गोष्ट अशी कि यामध्ये गुंतवलेली (Personal Finance) रक्कम वाढवल्याने तुमचे रिटर्न देखील वाढतील. त्यामुळे कालांतराने, SIP ची रक्कम देखील वाढवली पाहिजे.
हे ही वाचा : म्युच्युअल फंड SIP चे फायदे काय आहेत? समजून घ्या त्याचे संपूर्ण गणित