हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेली वाढ आज थांबली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसी (आयओसी-इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) ने मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, यापूर्वी सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर 5 पैशांनी तर डिझेलच्या किंमती प्रतिलिटर 13 पैशांनी महागले होते. मंगळवारी राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव हा 80.43 रुपयांवर स्थिर आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये आहे.
आज देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या :
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये तर डिझेल 80.53 रुपये आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.59 रुपये आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.77 रुपये आहे.
लखनऊ – पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.49 रुपये आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.40 रुपये आहे.
भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 79.95 रुपये आहे.
जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये आहे.
चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये तर डिझेल 71.98 रुपये आहे.
मुंबई – पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 78.83 रुपये आहे.
कोलकाता – पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 75.64 रुपये आहे.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 77.72 रुपये आहे.
पेट्रोल कधी स्वस्त होईल – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सध्या जगातील आणि देशातील अर्थव्यवस्था या एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहेत. जागतिक तेल आणि गॅस इंडस्ट्रीही कोरोनाच्या जागतिक साथीच्या आजारामुळे मागणी आणि पुरवठा या विलक्षण संकटातून जात आहे. देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मेमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही सुमारे 70 टक्क्यांनी घटली आहे. जूनमध्ये आर्थिक कार्यक्रम पुन्हा सुरु झाल्याने मागणी हळूहळू वाढत आहे.
अशा परिस्थितीत नुकत्याच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा ग्राहकांवर फारसा परिणाम झालेला नाही. ते असेही म्हणाले की जेव्हा जेव्हा घरातील कुटुंबावर संकट येते तेव्हा घरातील व्यक्ती मोठ्या धैर्याने आर्थिक संसाधनांचे व्यवस्थापन करते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी देखील केली जाते, तेलाच्या किंमतीतील होणारी वाढ ही या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे. ते म्हणाले की लवकरच आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर स्थिर होतील. त्याचप्रमाणे पेट्रोलियम कंपन्याही त्यांच्या किंमती स्थिर करू शकतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.