हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) रविवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑईल यांनी रविवारी तेलाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर 82.08 रुपयांवर स्थिर आहेत, तर डिझेलचे दर प्रतिलिटर 73.27 रुपये आहेत. शनिवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे कपात केली आहे.
पेट्रोल डिझेलचे दर का बदलतात ?
आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीतील बदल थेट स्थानिक बाजारात दिसून येतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांनुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.
देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 82.08 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.27 रुपये आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 88.73 रुपये आणि डिझेलची किंमत 79.81 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 83.57 रुपये आणि डिझेल 76.77 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 85.04 रुपये आणि डिझेलची किंमत 78.58 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 82.36 रुपये तर डिझेल 73.59 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम पेट्रोल 80.23 रुपये तर डिझेल 73.74 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 82.26 रुपये तर डिझेल 73.49 रुपये प्रतिलिटर आहे.
पटना पेट्रोल 84.64 रुपये तर डिझेल 78.47 रुपये प्रतिलिटर आहे.
जयपूर पेट्रोल 89.29 रुपये तर डिझेल 82.31 रुपये प्रतिलिटर आहे.
घरबसल्या आपल्या शहरातील पेट्रोलची किंमत काय आहेत ते जाणून घ्या
एसएमएसद्वारे कोणतीही व्यक्ती दररोज आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत देखील तपासू शकते. इंडियन ऑईल ग्राहक RSP <डीलर कोड> हा नंबर 9292992249 वर पाठवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP <डीलर कोड> क्रमांक 9223112222 वर लिहू शकतात. एचपीसीएल ग्राहक HPPrice <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”