फिलिपाईन्स | आतंकवादी आपले हेतू पूर्ण करण्यासाठी आणि आपली दहशत पसरवण्यासाठी वेगवेगळे हल्ले करत असतात. आतंकवाद्यांचे हेतू हे भीती निर्माण करणे आणि ती तशीच ठेवणे असा असतो. जेणेकरून, देशाच्या व्यवस्थेला कधीही अस्थिर करता येऊ शकते. असाच एक आतंकवादी हमला फिलीपाईन्स या देशांमध्ये आज झाला. या ठिकाणी एक जहाज आतंकवाद्यांनी बॉम्बने उडवून दिले. यामध्ये 116 लोकांचा मृत्यू झाला आहे.
27 फेब्रुवारी रोजी 10 हजार टनाचे जहाज राजधानी मनिला पासून इलोइलो या शहराच्या रस्त्याने काग्यान -डी -ओरो या शहराकडे रवाना झाले होते. या जहाजामध्ये 899 यात्री आणि क्रू मेंबर्स होते. अल सय्यद नावाच्या आतंकवादी संघटनेने टीव्हीमध्ये बॉम्ब लपवून ठेवून, तो टिव्ही सामानामध्ये ठेवला होता. रात्री अकराच्या सुमारास जहाजामध्ये मोठा धमाका झाला आणि त्यामुळे जहाजाची मोठी हानी झाली. पाण्यात जहाज बुडल्याने 116 लोकांचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणात यात्री अजूनही बेपत्ता आहेत.
बॉम्ब हल्ल्यानंतर जहाजाने पेट घेतला आणि जहाज बुडायला लागले होते. जहाजाच्या कॅप्टनने जहाज खाली करण्याचे आदेश दिले. जहाज अत्यंत वेगाने पेट घेत होते व त्याच वेगाने बुडतही होते. जहाज पेट घेत असल्यामुळे, दोन्ही बाजूंनी लोकांनी पाण्यामध्ये उड्या घेणे सुरू केले. काही लोकांनी रेस्क्यू बोटमध्ये शरण घेतली. यादरम्यान 116 लोकांचा मृत्यू झाला. व 180 लोक अजूनही बेपत्ता आहेत.