हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Fact Check : SBI च्या ट्रान्सझॅक्शनशी संबंधित मेसेज सध्या व्हायरल होत आहे. SBI मध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आहे. या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, बचत खात्यात एका वर्षात 40 ट्रान्सझॅक्शन करता येतील. 40 पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन केले तर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी खात्यातील बॅलन्समधून 57.5 रुपये कापले जातील. तसेच एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास एकूण 173 रुपये कापले जातील.
PIB ने या मेसेजला बनावट असल्याचे म्हटले आहे
PIB Fact Check ने आपल्या फॅक्ट चेकमध्ये हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. PIB ने आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट करत म्हंटले की, बँकेने असा कोणताही नियम केलेला नाही. हे सर्व दावे खोटे आहेत. बँकेने ट्रान्सझॅक्शनसाठीचे नियम बदललेले नाहीत.
दर महिन्याला 5 फ्री ट्रान्सझॅक्शन करता येतील
अलीकडेच, PIB Fact Check द्वारे सांगण्यात आले की,” आता बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 फ्री ट्रान्सझॅक्शन करू शकता. यानंतर, ट्रान्सझॅक्शनसाठी किंवा जास्तीत जास्त 21 रुपये द्यावे लागतील.”
अलीकडेच PIB Fact Check ने आणखी एका व्हायरल मेसेजला बनावट असल्याचे म्हटले होते. या व्हायरल मेसेजमध्ये केंद्र सरकार आधार कार्डधारकांना 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात होता. याबाबत PIB ने म्हटले की,” हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. यात कोणतेही तथ्य नाही. केंद्र सरकार आधार कार्डधारकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देणार नाही.”
PIB Fact Check म्हणजे काय ???
PIB Fact Check ही भारत सरकारची अधिकृत फॅक्ट चेक करणारी संस्था आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. अशा परिस्थितीत, पीआयबी फॅक्ट चेक अशा बातम्यांची पडताळणी करते आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रसार रोखते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx
हे पण वाचा :
PM Kisan Yojana च्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! या तारखेला मिळणार 12व्या हप्त्याचे पैसे
Stock Market : ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक !!!
Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Cotton Rate : कापसाच्या दरात विक्रमी वाढ, MCX वर कापूस 50,000 रुपयांच्या वर !!!
Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!