हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक मेसेज व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला सरकारकडून दरमहा 5,000 रुपये दिले जातील असा दावा करण्यात आलेला आहे. सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत या मेसेजच्या सत्येतबाबत सांगतले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले ???
केंद्र सरकारने नुकतेच प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना लाँच केली असून या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला सरकार कडून 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याचा दावा एका यूट्यूब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
एक #YouTube वीडियो में दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना के तहत सभी बेटियों को हर महीने ₹5,000 की नगद राशि मिलेगी #PIBFactCheck
▶️यह दावा फ़र्ज़ी है
▶️केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/LkPE8pOdKE
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 29, 2022
मेसेज बनावट असल्याचे PIB FactCheck ने म्हंटले
भारत सरकारची अधिकृत प्रेस एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली आहे. PIB FactCheck हँडलच्या वतीने एक ट्विट करत हा दावा खोटा असल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नसल्याचे म्हंटले आहे.
सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत येथे तक्रार करा
सरकारशी संबंधित कोणत्याही दिशाभूलकरणाऱ्या बातम्यांबाबत तक्रार करण्यासाठी आपल्याला PIB Fact Check ची मदत देखील घेता येईल. PIB FactCheck च्या 918799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकवर किंवा [email protected] या मेल आयडीवर मेल करून कोणालाही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx
हे पण वाचा :
Yes Bank कडून नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट FD च्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा!!!
ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!
LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…