हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधील धडाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे सहकारी अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख. राज्यात आता शिंदे – फडणवीसांचे सरकार असल्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुखमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले. त्यांच्यानंतर आता पडळकरांच्या मंत्रिपदाचीही चर्चा रंगू लागली आहे. अशात आता पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने फडणवीसांना स्वताच्या रक्ताने पत्र लिहले असून पडलकरांना मंत्री करा, अशी मागणी केली आहे. या पत्राची आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाची सध्या जास्त चर्चा सुरु आहे.
सांगली जिल्ह्यामधील जत येथील युवा नेते अनिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पिरु कोळी यांनी चक्क रक्ताने फडणवीसांना पत्र लिहले आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी आंदोलनातून एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, तसेच बैलगाडा शर्यत बंदी उठवणे, आदी मागण्या मांडल्या. आता नवे सरकार स्थापन झाल्यामुळे पडळकरांना कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्याच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.