Pixel 7 Pro : Google चा दमदार मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Pixel 7 Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google कंपनीचा (Pixel 7 Pro) स्मार्टफोन Pixel 7 Pro ची विक्री भारतात सुरु झाली आहे. Flipkart च्या माध्यमातून तुम्ही हा मोबाइल खरेदी करु शकता. गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर, 8GB रॅम आणि इतर अनेक फीचर्स मिळत आहेत. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलचे काही खास फीचर्स आणि यांच्या किमतीबाबत …

 6.7-इंचाचा डिस्प्ले –

या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा क्वाड -LTPO OLED डिस्प्ले आहे. हा मोबाईल Android 13 वर आधारित आहे. हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंगसह येतो . तसेच सुरक्षेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

Pixel 7 Pro

50MP मुख्य कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या (Pixel 7 Pro) स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम सह 48MP टेलीफोटो लेन्स आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी या स्मार्टफोनला 10.8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Pixel 7 Pro

5000mAh बॅटरी-

मोबाईलच्या स्टोरेज बाबत बोलायचं झालयास , (Pixel 7 Pro) मध्ये 12 GB RAM आणि 128 GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh च्या दमदार बॅटरीने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे.

Pixel 7 Pro

किंमत – (Pixel 7 Pro) 

भारतात या स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. या मोबाईलची किंमत 84,999 रुपये आहे. हा मोबाईल Hazel, Obsidian आणि Snow कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

WhatsApp वर लवकरच मिळणार हे 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Diwali Sale : Samsung च्या टॉप 5 सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर सूट

Oppo A17 : 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी; Oppo ने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन

200MP कॅमेरासह Xiaomi ने लॉन्च केले 2 दमदार स्मार्टफोन; पहा किंमत

Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार