Plane Crash In Afghanistan : रशियाला जाणारे भारतीय विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले?? DGCA ने केला मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाला जाणारे भारतीय प्रवासी विमान अफगाणिस्तान मध्ये कोसळलं (Plane Crash In Afghanistan) असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे विमान रशियातील मास्को या शहरात उतरणार होते,मात्र अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान क्रॅश झालं आहे . तेथील स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हे विमान भारतीय विमान नाही असा खुलासा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केला आहे.

सदर विमान अफगाणिस्तानमार्गे रशियाला जात होतं. त्याच दरम्यान, अफगाणिस्तानच्या बदख्शान या डोंगराळ भागात हे प्रवासी विमान कोसळलं आहे. यथील पोलिसांनी सांगितलं, की हे विमान काल रात्री रडारवरुन अदृश्य झालं होतं. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे विमान क्रॅश झालं. बदख्शानच्या माहिती विभागाचे प्रवक्ते जबिहुल्ला अमिरी यांनी टोलो न्यूजला सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक टीम या भागात पाठवण्यात आली आहे. तेथील स्थानिकांनी दावा केला हे कि एक भारतीय विमान आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र हे विमान भारतीय विमान नसल्याचे समोर आलं आहे.

भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितलं कि, अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेला दुर्दैवी विमान अपघात हा भारतीय अनुसूचित विमान किंवा नॉन-शेड्युल्ड (NSOP)/चार्टर विमान नाही. हे मोरक्कन-नोंदणीकृत छोटे विमान आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना म्हंटल कि, बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यांच्या बाजूने तोफखानाच्या डोंगरावर कोसळलेले विमान मोरोक्कनचे नोंदणीकृत DF 10 विमान होते. भारतीय विमान त्या मार्गाने कधीही प्रवास करत नाही.