नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. तसेच उत्पादनाबरोबरच विक्रीतही वाढ होईल.”
गोयल म्हणाले की,”PLI योजनेंतर्गत रोजगारासोबतच उत्पादन आघाडीलाही वेग येईल. यामुळे उत्पादन मूल्य 2,31,500 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.” ते पुढे म्हणाले की,” या योजनेसाठी निवडलेल्या 20 वाहन कंपन्यांनी 45,000 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. ही योजना 25,938 कोटी रुपयांची आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की, यामुळे 2,31,500 कोटी रुपयांचे उत्पादन वाढेल.”
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यासही दिलासा मिळेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात PLI योजनेद्वारे पाच वर्षांत देशभरात 60 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील असे सांगितले होते. गोयल म्हणाले की,”PLI योजनेव्यतिरिक्त सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची योजना आहे. त्यामुळे रोजगाराच्या आघाडीवरही मोठा दिलासा मिळणार आहे.”
एकूण 115 अर्ज मिळाले
अवजड उद्योग मंत्रालयाचे म्हणणे आहे की,” या योजनेसाठी अर्जाची विंडो 60 दिवसांसाठी खुली होती. 9 जानेवारीपर्यंत एकूण 115 अर्ज आले होते. यापैकी 87 वाहने ऑटो कंपोनंट कॅटेगिरीमध्ये आणि 38 वाहने OEM वाहन कॅटेगिरीमध्ये आली. यापैकी दोन्ही कॅटेगिरीसाठी 5 अर्ज आले आहेत. OEM कॅटेगिरी अंतर्गत 28 अर्जांपैकी, 20 पात्र मानले गेले आहेत.”
भारत ई-वाहनांना सर्वाधिक इन्सेन्टिव्ह देत आहे
इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळणाऱ्या इन्सेन्टिव्ह बद्दल गोयल म्हणाले की,”भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात सर्वोत्तम इन्सेन्टिव्ह देत आहे. याचाच परिणाम म्हणून आगामी काळात बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढ रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या इको-सिस्टीमला चालना मिळण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट साठी PLI स्कीम (25,938 कोटी रुपये), ACC साठी PLI (18,100 कोटी रुपये) आणि FAME योजना (रु. 10,000 कोटी) भारताला पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ, टिकाऊ, प्रगत आणि उत्तम EV बेस्ड सिस्टीम बनवण्यासाठी मदत करेल.”