PM Kisan Yojana : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होत आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते पाठवण्यात आले असून, 14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात.
ई-केवायसी करणे अनिवार्य –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकता. पण तरीही तुम्हाला संधी आहे. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही सीएससी केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अशा प्रकारे ई-केवायसी करा –
– ई-केवायसीसाठी, सर्वप्रथम पीएम किसानला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– येथे तुम्हाला होम स्क्रीनवर eKYC च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल. नंतर सर्च वर क्लिक करा
– तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्हाला Get OTP वर क्लिक करावे लागेल.
– तुमचा OTP टाकल्यानंतर सबमिट दाबा. आता तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
हे दस्तऐवज पीएम किसान योजनेसाठी आवश्यक आहे –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते असणे बंधनकारक आहे. यासोबतच जमिनीची कागदपत्रे, रहिवासी दाखलाही आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही कागदपत्रांच्या अनुपस्थितीत, शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहू शकतो. तसेच, अर्ज करताना कोणतीही माहिती भरताना झालेली छोटीशी चूक तुम्हाला 14 व्या हप्त्यापासून वंचित ठेवू शकते.