हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे (PM Kisan Yojana) यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी या हप्त्याकडे डोळे लावून बसला होता. अखेर हा हप्ता कधी जमा होणार हे सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंडलाजे यांनी याबद्दल माहिती देता सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतील. या हप्त्याद्वारे केंद्र सरकार 9 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी 18 हजार कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये मोदींनी 12 व्या हप्त्याच्या रूपाने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आणि सरकारच्या अन्य सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. हॅलो कृषी मध्ये पीएम किसान योजनेच्या संबंधित सर्व माहिती तर मिळतेच याशिवाय मोदी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटात तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त हॅलो कृषी अँप मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, सर्व पिकांचे बाजारभाव, जमीन मोजणी, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतात. महत्त्वाचे म्हणजे 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुम्हाला या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही (PM Kisan Yojana) मोदी सरकारची अतिशय नावाजलेली योजना म्हणता येईल. 24 फरवरी 2019 रोजी ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून करण्यात येते. 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येते. आत्तापार्यंत या योजनेचा लाभ देशभरातील अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.