पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

0
69
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. मराठी माणसांची अस्मिता जागी करणारा हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची जगभर ओळख आहे. सडेतोड भाष्य करण्यासाठी आणि हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी आयुष्य खर्ची घातलं. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षासोबत २५ वर्षांहून अधिक काळ युती टिकू शकली ते बाळासाहेबांचा धाक असल्यामुळेच.

मात्र २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवससेनेत फाटाफूट झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांप्रति आजही आदर असल्याचं दाखवत त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेब आजही प्रेरणा देतात असं म्हटलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या आवाजातील मजकूर देत बाळासाहेबांना अभिवादन करणारा खास व्हिडियो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here