नवी दिल्ली । देशात करोनाचं संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत चाललं आहे. केंद्र सरकार असो देशातील राज्य सरकारे करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशातील सर्व आर्थिक, सामाजिक व्यवहार बंद आहेत. अशा सर्व बिकट परिस्थितीत चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील करोनाची परिस्थितीवर संसदेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. या साठी सर्व पक्षांचे संसदेतील नेते उपस्थित राहतील. अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. लॉकडाउननंतर मोदींनी पहिल्यांदाच कोरोनावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”