मुंबई । “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. याशिवाय ”या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे,” असं विधानही फडणवीस यांनी केलंय. फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
”भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात. पण कुणीही पक्षात जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात, असा टोला फडणवीसांना लगावला. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे. एकत्र लढण्याचा तिन्ही पक्षांना तात्कालिक फायदा होईल, पण त्यांच्या राजकीय स्पेसमध्ये किती जण मावतील, यात शंकाच आहे. आणि ती स्पेस भाजपसाठी मोकळी असून आम्ही व्यापल्याशिवाय राहणार नाही, एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही, असं फडणवीस म्हणाले.
येत्या काळात लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यांना चांगल्या जबाबदारी आपण देणार आहोत, परिवारामध्ये छोटा वाद होतो पण ते परत एकत्र येतात. त्यामुळे सानप आपल्यासोबत आले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’