हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) एकही सुट्टी घेतली नाही असं RTI च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. प्रफुल पी सारडा नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता कि, पंतप्रधान झाल्यापासून मोदी किती दिवस कार्यालयात गेले? यावर उत्तर देताना RTI ने सांगितलं कि, नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोणतीही रजा घेतलेली नाही, ते सर्व दिवस ड्युटीवर आहेत.
यासोबत प्रफुल पी सारडा यांनी आणखी एक अहवाल मागितला होता. भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या आणि विविध कार्यक्रम आणि समारंभांना उपस्थित लावलेल्या एकूण दिवसांच्या संख्येबद्दल तपशील मागवला होता. याला उत्तर देताना पीएमओची वेबसाइट लिंक देण्यात आली आहे. यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे कि, 3,000 पेक्षा जास्त कार्यक्रमांना मोदींनी उपस्थिती लावली आहे. पीएमओचे सचिव परवेश कुमार यांनी आरटीआयचे उत्तर दिले होते.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच पंतप्रधान कसे कार्य करतात यावर प्रकाश टाकला होता. बँकॉकमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले: “मला वाटतं की यावेळी पंतप्रधान मोदींसारखा माणूस मिळणं हे देशाचं खूप मोठं भाग्य आहे. आणि मी हे म्हणत नाही कारण ते आजचे पंतप्रधान आहेत. आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे. दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी दिवसातून फक्त दोन तास झोपतात असा दावा केला होता.
2016 मध्ये अशाच प्रकारच्या आरटीआय प्रश्नालाही असाच प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी, एका आरटीआय अर्जदाराने देशाच्या पंतप्रधानांसाठी सुट्टीचे नियम आणि प्रक्रियांची प्रत कॅबिनेट सचिवालयाकडे मागितली होती. त्यावेळीही पंतप्रधान हे सर्व वेळ ड्युटीवर असतात असे म्हणता येईल,” असे पीएमओकडून माहिती अधिकाराच्या (आरटीआय) उत्तरात म्हटले होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, एचडी देवेगौडा, आयके गुजराल, पीव्ही नरसिंह राव, चंद्रशेखर, व्हीपी सिंग आणि राजीव गांधी यांनी कोणतीही रजा घेतली होती का आणि त्यांच्या काही नोंदी आहेत का, हेही अर्जदाराला जाणून घ्यायचे होते. त्यावर उत्तर देताना आरटीआय ने म्हंटल कि, “मागील पंतप्रधानांच्या रजेच्या नोंदीसंबंधीची माहिती या कार्यालयाकडे असलेल्या नोंदींचा भाग नाही. परंतु, हे लक्षात घ्यावे की विद्यमान पंतप्रधानांनी म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोणत्याही रजा घेतलेली नाही.