नवी दिल्ली । केंद्र सरकार तरुण व्यावसायिकांना सामावून घेण्याचे, निवृत्त अधिकाऱ्यांकडून सूचना घेण्याचे आणि प्रशासनासाठी व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रकल्प निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्याची योजना आखत आहे. याशिवाय आठ वेगवेगळे गट इतर विविध टप्प्यांवर लक्ष ठेवतील. या गटांमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्यांचा समावेश असेल. सूत्रांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की,”तंत्रज्ञानावर आधारित संसाधने विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या टीममध्ये भरती करण्यासाठी व्यावसायिकांचा एक पूल तयार करण्यासाठी 77 मंत्र्यांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारमध्ये आणखी पारदर्शकता, सुधारणा आणि कार्यक्षमता आणण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या कार्यालयात अशाच प्रकारचे इतर उपक्रम चालवले जातील.” मंत्र्यांची आठ गटांमध्ये विभागणी करण्याचा सराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण परिषदेच्या ‘चिंतन शिबिरां’नंतर झाला, त्यातील प्रत्येक बैठक सुमारे पाच तास चालली.
अशी एकूण पाच सत्रे घेण्यात आली. यामध्ये वैयक्तिक कार्यक्षमता, केंद्रित अंमलबजावणी, मंत्रालय आणि भागधारकांचे काम, पक्ष समन्वय आणि प्रभावी संवाद आणि संसदीय पद्धती यांचा समावेश होतो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही शेवटच्या चिंतन शिबिरांत भाग घेतला.
या सर्व बैठकांमध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यावर भर होता. गटांची निर्मिती हे त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, मंत्र्यांचा दृष्टीकोन आणखी व्यावहारिक बनवून प्रशासनातील एकूण सुधारणांवर व्यापकपणे लक्ष केंद्रित करणे आहे, असे सूत्रांनी सांगितले. मंत्रिपरिषदेतील सर्व 77 मंत्री ‘या’ आठ गटांपैकी एका गटाचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक गटात नऊ ते दहा मंत्र्यांचा समावेश आहे. प्रत्येक गटात एक मंत्री समन्वयक म्हणून नियुक्त केला आहे.