पंतप्रधान मोदी जगात भारी; लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यातीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. 71 टक्के रेटिंग सह मोदींनी ही लोकप्रियता मिळवली आहे. मोदींनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही पहिला क्रमांक पटकावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं मॉर्निंग कन्सल्टंट पोलिटिकल च्या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

या सर्वेक्षणात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून ४१ टक्के लोकांनी मॉरिसन यांच्या बाजूने मतदान केलंय.