देशाच्या भलाईसाठी मोदीजी डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला ऐका!- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी विनम्रतेने मनमोहन सिंग यांचा सल्ला स्वीकारतील, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

दरम्यान, भारत-चीन संघर्षानंतर राहुल गांधी दररोज ट्विट करुन मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना निशस्त्र का पाठवले इथपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनला बहाल केला का, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये कालच जुंपली आहे.

काल राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख थेट Surender Modi असा केला होता. यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राहुल गांधी यांचे हे ट्विट भारतीय सैन्य आणि जनतेचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”