नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र बैठकीपासून ३ राजकीय पक्षांना मोदी सरकारने दूर ठेवलं आहे. या पक्षांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि टीडीपी यांना बैठकीचे आमंत्रित केले नसल्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. वास्तविक या बैठकीला ५ खासदार असलेल्या पक्षांना चर्चेत बोलविण्यात आले आहे. परंतु या तिन्ही पक्षांचे खासदार संसदेत ५ पेक्षा कमी असल्यानं त्यांना आमंत्रण दिलं नसल्याचे कारण समोर केलं जात आहे.
सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखी विरोधी पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे. या बैठकीला एकूण १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाग घेतील. बैठकीची आजची वेळ महत्त्वाची आहे, कारण सत्ताधारी भाजप सरकारवर सर्व राजकीय पक्षांनी, विशेषत: कॉंग्रेसकडून या विषयावर सविस्तर निवेदन देण्यासाठी दबाव आणला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. लडाख सीमावादाबाबत आणि चीनकडून सीमा रेषेचे होणारे उल्लंघन आणि सीमा संघर्षावरील राजकीय सहमती आवश्यक आहे. त्यासाठी या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी चीन सैन्याकडून झालेल्या हिंसक झडपेत भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह किमान २० भारतीय सैन्य जवान शहीद झाले होते. त्यानंतर अधिक तणाव निर्माण झाला आहे.
हे नेते लावणार सर्वपक्षिय बैठकीला हजेरी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, चे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान, सिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, टीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती समाजवादी पार्टीच नेत अखिलेश यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”