नागपूर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात सध्या मोदींना दूर करण्याचे विचार काण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. लोकसभा निकालाच्या दोन दिवस आधी होणारी हि भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते आहे.
मागील चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यात कोणतीच भेट झाली नाही. मात्र लोकसभा निकालात भाजप कोणती स्थिती प्राप्त करतो आणि त्यानंतर राजकीय रणनीती काय ठेवण्यात यावी याबद्दल नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सल्लामसलत करणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संघ नाराज आहे. जर भाजपला स्वतःचे पूर्ण बहुमत मिळले नाही तर नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त अन्य भाजप नेत्याला पंतप्रधान पदाची संधी दिली जाऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीणी राजनाथ सिंह यांची नावे सध्या तरी चर्चेत आहेत. मात्र नरेंद्र मोदी मोहन भागवत यांच्या मनात कोणती जागा मिळवू शकतात यावर पुढील बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत. परंतु नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाला त्यांच्या पक्षातूनच मोठे आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत.