कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही; मोदींचा काँग्रेसला सणसणीत टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनीकन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. “एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी. पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

माझ्या भाषणाने काँग्रेस उघडी पडेल अशी भीती असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काँग्रेसची लोकसभेत एक भूमिका, तर राज्यसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि कन्फ्यूज पार्टी मी कधी पाहिली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला. तसेच कोरोनावरही भाष्य केलं आहे. कोरोना प्रकोपात जग हलले, परंतू आम्ही वाचलो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मनीष तिवारी म्हणाले होते.

‘कृषी कायदे बंधनकारक नाहीत’
कृषी कायदे हे कोणावरही बंधनकारक नाहीत. ती केवळ एक नवी व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था स्वीकारायची की नाही, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अन्यथा तुम्ही जुन्या व्यवस्थेत कायम राहू शकता. सरकारला बाजार समित्याही कायम ठेवायच्या आहेत. त्यामुळेच अर्थसंकल्पात बाजार समित्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment