हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं कोणत्या मुद्द्यावरून बोलणार याकडे सर्वांचे देशवासियांचे लक्ष्य लागले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर मोदी बोलण्याची शक्यता आहे. याचसोबत ते लोकांना कोरोनामध्ये घ्यायची काळजी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून काळजी घेण्याचे आवाहन देशवासियांना करतील.
Prime Minister Narendra Modi to address the nation at 5 PM today, 7th June. pic.twitter.com/722gehNL6a
— ANI (@ANI) June 7, 2021
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केलेली अनेक राज्य अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी पुढे काय काळजी घेतली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.