हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अंधेरी पूर्व येथील सैफ अकादमीचे उदघाटन मोदी आज करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३ आठ्वड्यामधील मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा असणार आहे.
आज दुपारी २ वाजता मोदी मुंबईत दाखल होतील. मोदींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत . यामध्ये मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे
मोदी दुपारी 2.10 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील. 2.45 ला ते सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर प्लॅटफॉर्म 18 वरून वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. नंतर 4.30 वाजता ते मरोळ येथील ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन करतील . 5.50 वाजता मोदी मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जातील आणि त्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.