हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : गेल्या महिन्यांत RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले . SBI, HDFC नंतर आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देखील आपला MCLR वाढवला आहे.
PNB ने म्हटले आहे की बुधवारी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले असून त्याचा परिणाम होम लोन, ऑटो आणि पर्सनल लोन सहित सर्व प्रकारच्या कर्जांवर दिसून येईल.
कर्जावर किती व्याज असेल ???
PNB कडून सांगण्यात आले की, हे नवीन दर लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता. हे लक्षात घ्या कि, बँकेची बहुतांश कर्जे केवळ MCLR वर आधारित आहेत, त्यामुळे त्या कर्जांचे हप्तेही आता वाढणार आहेत.
PNB कडून एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठीचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला गेला आहे. यानंतर एका दिवसाच्या कर्जावरील नवीन दर 6.60 वरून 6.75 टक्के झाला आहे. एक महिन्याचा MCLR आता 6.80 टक्के आहे, जो पूर्वी 6.65 टक्के होता. याशिवाय, एक महिन्याचा MCLR देखील 0.15 टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याचा नवीन दर आता 6.90 टक्के झाला आहे, जो पूर्वी 6.75 टक्के होता.याशिवाय बँकेकडून 6 महिन्यांच्या कर्जावरील व्याजदरही 7.10 टक्के केला गेलेला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जावरील MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून 7.70 टक्के केला आहे.
SBI चेही होम लोन आजपासून महागले
SBI ने आजपासून आपल्या होम लोनसाठी नवीन दर लागू केले आहेत. बँकेचे हे नवीन दर नवीन कर्जदारांसोबत आधीच सुरू असलेल्या EMI वर देखील लागू होतील. वास्तविक, रेपो दरात वाढ केल्यानंतर, SBI ने एक्सटर्नल बेंचमार्क लेन्डिंग रेटमध्ये 40 बेस पॉइंट्स किंवा 0.40 टक्क्यांची वाढ केली आहे. जो आता 7.05 टक्के झाला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html
हे पण वाचा :
LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही
Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आजचे नवीन दर पहा
Investment Tips : वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या
Tax Saving :’या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मजबूत रिटर्नसह मिळवा टॅक्स सूट !!!
Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!