जालना : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. या राजकीय घडामोडींमुळे राज्यात कोणतेही विघ्न घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा हायअलर्ट झाली आहे. त्यातच आता जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांनी तलवारींचा मोठा शस्त्रसाठा (swords seized) जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या 9 धारदार तलवारी जप्त करण्यात (swords seized) आल्या आहेत.
शहरातील वाल्मिकनगर परिसरात छापा मारून पोलिसांनी तलवारीचा मोठा साठा जप्त (swords seized) केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. शहरातील अवैध शस्त्र शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने तीन वेगवेगळे पथक तयार करून त्याद्वारे शोध मोहीम सुरू केली होती.
यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी वाल्मीक नगर येथील शेख कलीम शेख शरीफ याच्या घरी छापा मारला. यावेळी घरात एका लोखंडी पेटीत वेगवेगळ्या आकाराच्या 9 धारदार तलवारी सापडल्या (swords seized). यानंतर त्याची चौकशी केली असता सदर तलवारी मंगलबजार येथील आफ्रोज हाफिज पठाण यांच्या मार्फत खरेदी केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी यापूर्वी अजून किती तलवारी खरेदी विक्री केल्या आणि त्याचा कुठे घातपातसाठी वापर केला जाणार होता का तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!
मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट
अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर
शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल
Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!