गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
गडचिरोली प्रतिनिधी |गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शेवटचे पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावांच्या मधोमध असलेल्या पहाडीच्या झ-याजवळ सर्चिंग अभियानावर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियान राबविणा-या सी 60 दलासोबत नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत पोलीसांनी स्वत:चे कुठलेही नुकसान होऊ न देता दोन नक्षल्यांचा खात्मा केलाय.
आज दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास जोरदार चकमक उडाली. यात सी -60 ने आपले कौशल्य पणाला लावत नक्षल्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या चकमकीत दोन नक्षल्यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
यात एक महिला नक्सली असुन ती नक्षल नेता भास्कर ची पत्नी रामको असल्याचे विश्वसनीय परंतू पूष्टी न झालेली माहिती आहे. आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऊल्लेखनीय असे की लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदानाच्या पूर्वसंध्येला व पोलींग पार्ट्या परत येत असताना गट्टा गावातच नक्षल्यांनी घातपात घडवून आणला होता.

Leave a Comment