2 लाखांची बुलेट फक्त 50 हजारात विकायचे.. पोलिसांनी ‘असा’ केला भांडाफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | दोन ते अडीच लाखांची बुलेट अवघ्या पन्नास हजाराला विक्री करणाऱ्या 2 चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फौजदार चावडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून पाच लाख 11 हजार रुपये किमतीच्या चार बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बजरंग नागनाथ चव्हाण (वय 23 रा. सातारारोड, सापगारूडी गल्ली, ता. जत जि. सांगली) आणि राजू सदाशिव साळुंके (रा. कोळगिरी ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बुलेट मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. मोटारसायकल चोरांचा तपास करत असताना पोलिसांना अज्ञात व्यक्ती बुटेल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकाने बाळे पुलाखाली सापळा रचला होता. बुधवारी दुपारी दोघे बुलेट वरून येताना दिसले. त्यांना अडवून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी बुलेट चोरल्याची कबुली दिली. दोन बुलेट फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तर बाकी 2 वैराग आणि गडहिंग्लज येथून चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे,पोलीस नाईक दीपक डोके, पोलीस नाईक धनंजय बाबर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद व्होटकर, समाधान मारडक, अवेज चव्हाण,नितीन मोरे, कृष्णाबडूरे, चानकोटी, आवज बागलकोट, खरटमल,दराडे यांनी पार पाडली.

Leave a Comment