Wednesday, October 5, 2022

Buy now

MPSC आयोगाला अश्लिल अपशब्द अन् शिवीगाळ; तरुणावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर अर्थातच एमपीएससी बद्दल आक्षेपार्ह भाषा लिहिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. काहीवेळा स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रकात बदलही केले जातात. तर काहीवेळा परीक्षा रद्द हि केल्या जातात. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांकडून अनेकवेळा आयोगावर टीका केली जाते. मात्र, आता आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून याबाबत विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ट्विट करून या घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर केलेल्या टिकेबद्दल व आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून केलेल्या शिवीगाळ प्रकारचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.