पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ट्रोल करणार्या युवकाला मारहान केल्याच्या घटनेवरुन वादंग उठले आहे. आव्हाड यांना सोशल मीडियावरुन लक्ष्य केलं जात आहे. तरुण अभियंत्याला मारहाण प्रकरणानंतर भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक असताना आता सोशल मीडियावरही नवं युद्ध सुरू झालं आहे. अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर मंत्री आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर अर्वाच्च्य भाषेत टीका होत आहे. आता पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनच्या एका पोलिस सबइन्स्पेक्टरने आव्हाड यांना जित्या म्हणत अर्वाच्य भाषा वापरुन कमेट केल्याचे बोलले जात आहे.
एका तरुण अभियंत्याने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप या तरुण अभियंत्याने केला. यानतर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी करत आव्हाडांवर टीका केली. आता एका पोलिस अधिकार्यानेही अर्वाच्य भाषा वापरत आव्हांड यांच्यावर टिका केल्याने अनेकांच्या माना उंचावल्या आहेत. सतीस कुलकर्णी नामक फेसबुक प्रोफाइलवरुन सदर कमेंट करण्यात आली असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सुहास गडेकर यांनी दिली आहे. आव्हाड यांनी गडेकरांची सदर पोस्ट रिट्विट केली आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशनचे PSI सतीश कुलकर्णी यांचे @Awhadspeaks आव्हाड साहेबांविषयी कंम्नेट्स पहा
— Suhas_GSpeaks (@SuhasGSpeaks) April 8, 2020
@AnilDeshmukhNCP@OfficeofUT @satejp जनतेचे सेवक आणि अधिकारी लोकप्रतिनिधी वर अशी भाषा वापरत असतील तर यावर कारवाई अपेक्षित आहे. खाली लिंक देतोयhttps://t.co/Pb1iQBVvCB pic.twitter.com/1XsHT87sOd
दरम्यान, काही सोशल मीडिया युझर्सकडून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही खालच्या भाषेत शिवीगाळ केली जात आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याच नावाने अकाऊंट तयार करुन त्यांना शिवीगाळ केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी नुकतीच भाजपने केली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावरुन सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी एका पोलिस अधिकार्याने सोशल मीडियावर ‘जित्या तू हंडगा आहेस’ असं म्हटलं आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र#HelloMaharashtra @dhananjay_munde @NCPspeakshttps://t.co/GSmvx0wrbr
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 8, 2020
कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी #CoronaWarriors #Covid_19india #CoronaInMaharashtra #HelloMaharashtra https://t.co/PDJlAvdfUC
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020