हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर … Read more

लढवय्या जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण

जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

केरळने कोरोनाला झोडपून काढलंय, आपण त्यांच्याकडून काय शिकणार..??

मजबूत आरोग्य सुविधा आणि कोरोना विषाणूविरुद्धची प्रभावी रणनीती यामुळे केरळने कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारली आहे. मृत्यूंची संख्या मर्यादित ठेवण्यात केरळने मिळवलेलं यश इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक आहे.

तेलाचे दर शून्याच्या खाली का आले?

सोमवारी नैसर्गिक तेलाच्या किमती वजा ४० (-४०) डॉलरपर्यंत खाली पोहोचल्या, म्हणजे आता विक्रेत्यानेच खरेदी करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. हे जितके दिसते तेवढे अतार्किक आहे का? एवढी घसरण कशामुळे झाली? भारत आणि जगासाठी याचा काय अर्थ आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न उदित मिश्रा आणि नुषाइबा इक्बाल यांनी केला आहे.

संकुचित झालेल्या लोकशाहीत, एकमेकांतील अंतर वाढवण्यासोबतच गरिबांना झिडकारणं हेच नव्या भारताचं चित्र असेल?

संचारबंदीनंतर देश लोकशाही संकुचित होणे, एकमेकांतील अंतर वाढणे, गरिबांपासूनची अलिप्तता कायम ठेवणे – कदाचित ही नवीन सामान्य स्थिती असू शकते. – सुहास पळशीकर 

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘वाईन शॉप्स’ सुरु करायचा दिला सल्ला

मुंबई | देशात लाॅकडाउन सुरु होऊन आता जवळपास महिना होत आला आहे. या काळात सर्व दुकाने, हाॅटेल, कारखाने बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यापार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात ठाकरे यांनी वाईन्स शाॅप सुरु करायचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंचे संपुर्ण पत्र खालीलप्रमाणे … Read more

अजित पवारांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र, मजूरांना घरी जाण्यासाठी पुणे-मुंबईहून विशेष गाड्या सोडा

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील लाॅकडाउनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त स्थलांतरित मजूरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने खिशार पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने आता खायचं काय अन् रहायचं कुठे असा प्रश्न या मजूरांच्या समोर उभा ठाकला आहे. … Read more

घाबरु नका, जनतेसाठी सरकारी तिजोरी नेहमीच उपलब्ध – नितीन गडकरींचा देशवासीयांना दिलासा

देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

चंद्रकांतदादा म्हणाले, भाजपचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही पण..

पुणे । विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याला भाजपचा विरोध नाही आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस करणं चुकीचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नव्हता. तरी त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याच्या शिफारशीची एवढी … Read more

विशिष्ट समुदायावर टीका करताना मुख्य आजाराकडे दुर्लक्ष नको

जातीय वादविवादाच्या सर्वोच्च कमानीमध्ये अडकलेली तबलिगी जमात आणि त्यांच्या संदेशांमध्ये साथीच्या आजाराशी लढण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष न हटविणे हे खुप महत्वाचे आहे.