कोरोनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । देशात करोनाचं संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत चाललं आहे. केंद्र सरकार असो देशातील राज्य सरकारे करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशातील सर्व आर्थिक, सामाजिक व्यवहार बंद आहेत. अशा सर्व बिकट परिस्थितीत चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more

माध्यमातल्या खोट्या बातम्यांकडे भारतीय मुस्लिम आणि सुजाण नागरिकांनी कसं पहावं?

मीडियातली लोकं नेहमीप्रमाणे मुसलमानांना विकृत भावनेनं बघण्याचे धडे जगाला देत होती. परंतु त्याच दिवशी टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी फेक असल्याचं जाहीर केलं. मूऴ व्हिडिओ मुंबई मिररनं काढला होता. काही वर्षांपूर्वीचा तो व्हिडियो होता.

मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

Video: अटलजींची कविता शेअर करत मोदी म्हणाले.. ”आओ दीया जलाएं”

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदींनी काल पुन्हा एकदा जनतेला संबोधित करत लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटाला प्रकाश पसरवण्यास सांगितले. या दिवशी सर्वानी घरातील दिवे बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन देशातील १३० कोटी जनतेला केलं आहे. आपण सर्वानी करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून … Read more

संचारबंदी (लॉकडाऊन) नोटबंदीपेक्षा भयानक ठरेल – अर्थतज्ञ जीन ड्रिझ

अर्थव्यवस्था स्थिर नसताना, राज्य सरकार ताणतणावाखाली असताना आणि सार्वजनिक कामगार हे संसर्गाच्या भीतीखाली असताना सार्वजनिक वितरण प्रणाली चालविणे आणि तेही चांगल्या स्थितीत हे खूप कठीण होऊ शकतं. साखळीतील कोणतेही अंतर हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या भुकेला असुरक्षित करू शकेल.

घरोघरी डॉक्टर झालेत! कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत असा परखड सवाल राज ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिलला दिवे लावायच्या … Read more

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “डॉक्टरांना त्रास देणाऱ्या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यावर उपचार कसले करता? यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत म्हणे हे, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना … Read more

”आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं”; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसेच इव्हेंट करण्यापेक्षा जनतेच्या पोटापाण्याबद्दल बोलण्याचं आवाहनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ … Read more

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभर लाॅकडाउन आहे. करमणुक म्हणुन दूरदर्शनवर रामायण आणि महाभारताचे पुन्ह: प्रसारण करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. दूरदर्शनवर या मालिकांसोबत भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखिल प्रसारित करण्यात याव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सध्या लाॅकडाउनमुळे … Read more

दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का?- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला नागरिकांना दिवे लागण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून टीका केला आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचं आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचं संकट … Read more